• Download App
    Modi हिंमत असेल तर काँग्रेसने मुस्लिम पक्षाध्यक्ष करावा आणि निवडणुकीची 50 % टक्के तिकिटे मुसलमानांना द्यावीत!!

    PM Modi : हिंमत असेल तर काँग्रेसने मुस्लिम पक्षाध्यक्ष करावा आणि निवडणुकीची 50 % टक्के तिकिटे मुसलमानांना द्यावीत!!

    विशेष प्रतिनिधी

    हिस्सार : काँग्रेसमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी मुस्लिम पक्षाध्यक्ष करून दाखवावा आणि निवडणुकीचे 50 % तिकिटे मुसलमानांना द्यावीत, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातल्या हिस्सार मधून काँग्रेसला दिले. हरियाणातील वेगवेगळे विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी waqf सुधारणा कायद्याचे जोरदार समर्थन करत काँग्रेसचे वाभाडे काढले‌. If it has the courage, Congress should have a Muslim party president.

    पंतप्रधान मोदी म्हणाले :

    – काँग्रेसने संविधानाचा वापर आपल्या सत्तेच्या हत्यारासारखा केला. जेव्हा काँग्रेसची सत्ता धोक्यात आली तेव्हा काँग्रेसने संविधान गुंडाळून ठेवले. आज संविधान खिशात घेऊन फिरणारे संविधानाला फक्त सत्तेसाठी वापरत होते.

    – बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये स्पष्टपणे म्हटले होते की देशामध्ये कधीही धार्मिक आधारावर आरक्षण देता येणार नाही पण काँग्रेसने संविधान फाडून टाकून आपली राजवट असलेल्या राज्यांमध्ये धार्मिक आधारावर मुसलमानांना आरक्षण दिले.

    – काँग्रेसने तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी केवळ कट्टरपंथी मुस्लिमांना फायदा पोहोचवला. पसमांदा मुस्लिम, मुस्लिम महिला, मुस्लिम विधवा यांच्याकडे कायम दुर्लक्ष केले. 2013 मध्ये तुष्टीकरणाच्या राजकारणातूनच त्यांनी waqf कायदा करून त्याला संविधानाच्या वरती नेऊन ठेवले होते. आम्ही तो कायदा बदलून संविधानाचा सन्मान राखला.

    – काँग्रेसने देशातल्या दीन दलित, आदिवासी यांचा हक्क हिरावून तो कट्टरपंथी आणि धर्मांध मुस्लिमांना दिला. पण काँग्रेसने स्वतःच्या पक्षात कधी मुस्लिमांचा सन्मान केला नाही. काँग्रेसकडे तर हिंमत असेल, तर त्यांनी मुस्लिम पक्षाध्यक्ष करून दाखवावा आणि निवडणुकीची 50 % तिकिटे मुस्लिमांना देऊन दाखवावीत. पण काँग्रेसला स्वतःच्या पक्षात मुस्लिमांना स्थान द्यायचे नाही, तर देशातल्या इतर सामान्य नागरिकांचा हक्क हिरावून घेऊन तो कट्टरपंथी मुस्लिमांना द्यायचा आहे. काँग्रेसचा हा देश विघातक विचार आहे.

    If it has the courage, Congress should have a Muslim party president.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Kalyan-Ahilyanagar : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर एसटी बस खोल खड्ड्यात कोसळली; चालकासह दोघांचा जागीच मृत्यू, 20 जण जखमी

    CM Devendra Fadnavis : 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार; CM देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; पार्थ पवारांची भेट आणि मराठा आरक्षणावरही मांडली भूमिका

    पंचपरिवर्तन हाच आजच्या हिंदुत्वाचा युगधर्म; संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळेंचे प्रतिपादन