प्रतिनिधी
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून धर्मांतर, लव्ह जिहाद, एकतर्फी प्रेम, अत्याचार अशा घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्या उपस्थितीत रविवार ४ जून रोजी पुण्यात एक मोर्चा काढण्यात आला.Huge march of Hindu community in Ghorpadi in Pune for Anti-Love Jihad Act
पुण्यामध्ये घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्त्यावरून हिंदू समाजाने विराट मोर्चा काढत लव्ह जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे अशी एकमुखी जोरदार मागणी केली. या मोर्चाचे नेतृत्व भाजप आमदार नितेश राणे यांनी केले. यावेळी पावसाळी अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली.
दरम्यान या मोर्चात “जागो हिंदू जागो, हर नारी की यही पुकार, साक्षी के हत्यारों का करो संहार, शासन करो सक्त कडा दुबारा ना हो हत्यारा खडा” अशा प्रकारच्या घोषणा असलेल्या पाट्या हातामध्ये घेऊन हजारो नागरिक भर उन्हात रस्त्याने चालत होते. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवीत हिंदू महिला- मुली यांच्या विरोधात होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आणि धर्मांतराच्या विरोधात आपला आवाज बुलंद केला.
तसेच भारत माता की जय, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी उपस्थितांनी गळ्यामध्ये भगवे उपरणे धारण केले होते. तर पुरुषांनी भगव्या टोप्या धारण केल्या होत्या. हातामध्ये भगवे झेंडे घेऊन हजारो राष्ट्रप्रेमी नागरिकांचा मोर्चा लव्ह जिहाद विरोधी कायद्याची आवश्यकता अधोरेखित करीत होता.
Huge march of Hindu community in Ghorpadi in Pune for Anti-Love Jihad Act
महत्वाच्या बातम्या
- ताप, डोकेदुखी, मायग्रेनवर वापरल्या जाणाऱ्या १४ औषधांवर बंदी; कोडीन सिरप आणि पॅरासिटामॉलचाही समावेश!
- काँग्रेस नेते पी. चिदंबरम म्हणतात भारताने अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत स्वीकारावी; पंतप्रधानांचीही असावी फिक्स्ड टर्म
- हॉलिवूड स्टार लिओनार्दो डिकॅप्रियो भारतवंशीय तरुणीला करतोय डेट; जाणून घ्या, कोण आहे मॉडेल नीलम गिल?
- अजय बंगा यांनी स्वीकारला जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार, 5 वर्षांचा असेल कार्यकाळ; पुण्यात जन्म, अहमदाबादेतून एमबीए