• Download App
    Huge Hindu gatherings erupt in Pune area; Sangh's major public relations in new settlements and colonies पुणे परिसरात विराट हिंदू संमेलनांचा धडाका; नव्या वस्त्या, वसाहतींमध्ये संघाचा मोठा जनसंपर्क

    पुणे परिसरात विराट हिंदू संमेलनांचा धडाका; नव्या वस्त्या, वसाहतींमध्ये संघाचा मोठा जनसंपर्क

    Pune area

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुणे परिसरात विराट हिंदू संमेलनांचा धडाका लावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुण्याच्या परिसरातील नव्या वस्त्या आणि वसाहतींमध्ये मोठा जनसंपर्क साधला.Huge Hindu gatherings erupt in Pune area; Sangh’s major public relations in new settlements and colonies

    – कात्रज मध्ये हिंदू संमेलन

    आई-वडील हेच आपले खरे दैवत असून त्यांची सेवा करणे हेच सर्वात मोठे पुण्याचे काम आहे. राष्ट्रभक्ती म्हणजे केवळ सीमेवर जाऊन लढणे नव्हे, तर आपल्या परिसरातील समस्या सोडवून समाजहितासाठी कार्य करणे, ही देखील मोठी देशसेवाच आहे, असे प्रतिपादन महंत डॉ. श्रीकांतदास धुमाळ महाराज यांनी कात्रजच्या हिंदू संमेलनामध्ये केले.

    कात्रज येथील जैन आगम मंदिर परिसरातील दुगड फार्म मैदानावर आगम आणि अंजनी नगर हिंदू संमेलन समितीच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनानिमित्त भव्य ‘नववर्ष शोभायात्रा’ काढण्यात आली होती, ज्यामध्ये ७३० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. वीरशैव, पद्मशाली, तेली समाज आणि सेवालाल महाराज बिश्नोई समाजाचे चित्ररथ या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. विशेष म्हणजे, गेल्या दोन आठवड्यांपासून प्रशिक्षण घेतलेल्या ९८ विद्यार्थ्यांनी लाठी-काठीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले.



    संगणक अभियंता डॉ. राधिका कुलकर्णी यांनी मातृशक्तीला मार्गदर्शन करताना स्वदेशीचा मंत्र दिला. “मुलांना पाश्चिमात्य खाद्यपदार्थांऐवजी भारतीय पौष्टिक अन्नाची सवय लावा. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जग जिंकण्याची ताकद नारीशक्तीमध्ये आहे,” असे त्यांनी नमूद केले. प्रमुख वक्ते श्री. निलेश धायरकर यांनी इतिहासाचे संदर्भ देत हिंदू समाजाला संघटित होण्याचे आवाहन केले. “पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी घरात शिववंदना, पोथी-पुराणांचे वाचन आणि मंत्रजप करा,” असे त्यांनी सांगितले. या संमेलनासाठी परिसरातील २६ सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी एकत्र येत ‘सज्जनशक्ती’चे दर्शन घडवले. संमेलनाचे नियोजन संयोजक प्रवीण दुगड, मनोज माहोर आणि सागर वाघले यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने केले होते.

    – हडपसरला हिंदू संमेलनात महिलांच्या शौर्य प्रात्यक्षिके

    जातीभेद पूर्णपणे नष्ट करून समरस समाज घडवण्याचे आवाहन धर्माचार्य ह.भ.प. डॉ. जगदीश उंद्रे यांनी सकल हिंदू संमेलनात केले. ते म्हणाले, “समाज केवळ सुशिक्षित असून चालणार नाही, तर तो सुसंस्कारित असणे अधिक आवश्यक आहे.”

    बी. टी. कवडे रोड परिसरात आयोजित ‘विराट हिंदू संमेलना’त डॉ. उंद्रे बोलत होते. सकल हिंदू समाजाच्या वतीने हे संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी आयोजित चित्तथरारक शौर्य प्रात्यक्षिकांनी सर्वांचेच लक्ष वेधले. मुख्य वक्त्या सौ. मेनका उमडेकर यांनी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर मांडणी करताना कुटुंब प्रबोधन, समरसता, स्वदेशी, पर्यावरण संवर्धन आणि नागरिक कर्तव्य या पाच सूत्रांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच वक्ते महेश मानेकर यांनी संघाच्या कार्याचा परिचय देत संघटित समाजाचे महत्त्व स्पष्ट केले.

    कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सादर झालेल्या देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण परिसर निनादून गेला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे महिला आणि युवकांनी सादर केलेली चित्तथरारक शौर्य प्रात्यक्षिके. ‘दुर्गा वाहिनी’च्या स्वयंसेविकांनी लाठी-काठी आणि ‘नियुद्ध’ (विना शस्त्र झुंज) या स्वसंरक्षण प्रकारांचे प्रभावी सादरीकरण केले. विशेषतः रस्त्यावरील संघर्षात महिलांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक उपस्थितांची दाद मिळवून गेले. त्यानंतर आर्यव्रत अशोक चव्हाण या युवकाने तलवारबाजी, दांडपट्टा आणि लाठी-काठी चालवण्याचे कौशल्य दाखवून डोळ्यांचे पारणे फेडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल स्वयंसेवकांनी सादर केलेली शिस्तबद्ध सूर्यनमस्कार व नियुद्धची प्रात्यक्षिकेही आकर्षणाचे केंद्र ठरली. जागतिक कल्याणाची कामना करणाऱ्या ‘कल्याण मंत्राने’ या सोहळ्याची सांगता झाली.

    Huge Hindu gatherings erupt in Pune area; Sangh’s major public relations in new settlements and colonies

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chandrashekar Bawankule : तीन महिन्यांत ईटीएसद्वारे पाच वर्षांचे सर्वेक्षण ; राज्यातील अवैध दगडखाणींवर सरकारचा मोठा निर्णय

    Medha Kulkarni : ‘झीरो अवर’मध्ये वाढत्या मानवी तस्करीबाबत मेधा कुलकर्णी यांनी प्रश्न उपस्थित

    अशोक खरातने आपण दैवी अवतार असल्याचं सांगत महिलांच्या योनीत बोट घातले, लघवी पाजली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती