प्रतिनिधी
बीड : कर्नाटकातील उडुपी मध्ये महाविद्यालयातील 6 विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचा गणवेशाऐवजी हिजाब परिधान करून महाविद्यालयात प्रवेश केला. या मुद्यावरून कर्नाटक राज्यात ठिकठिकाणी मोठा वाद उत्पन्न झाला आहे. हे प्रकरण हाय कोर्टापर्यंत गेले आहे.”Hijab first, then Kitab”; Dispute in Karnataka reverberates in Maharashtra Beed Malegaon
हिचा परिधान करणे हा आमचा मूलभूत हक्क आहे, असा या मुस्लीम विद्यार्थिनींचा दावा आहे. येत्या तीन दिवसांमध्ये कर्नाटकातल्या शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय कर्नाटकच्या सरकारने घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद महाराष्ट्रातल्या बीड आणि मालेगाव या शहरांमध्ये उमटले आहेत. बीडमध्ये ठिकठिकाणी “पहले हिजाब, फिर किताब”, अशा आशयाची पोस्टर्स लागली आहेत. फारुकी लखमानी या विद्यार्थ्याने ही पोस्टर्स लावली आहेत. “हर किमती चीज पर्दे मे होती है”, असेही त्यावर लिहिण्यात आले आहे.
एकीकडे बीडमध्ये ही पोस्टर्स लागली असताना त्याचबरोबर मालेगाव मध्ये काही मुस्लिम महिलांनी एकत्र येऊन कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले आहे. कर्नाटकात तिथल्या सरकारने तीन दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात हिजाब वादाचे पडसाद उमटल्यानंतर महाराष्ट्रातले विकास आघाडी सरकार कोणती भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
“Hijab first, then Kitab”; Dispute in Karnataka reverberates in Maharashtra Beed Malegaon
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे विसरलात का?; राधाकृष्ण विखे-पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला!!
- राज्यसभेत मोदींचे उफाळले पवार प्रेम!!; सुप्रियांनी मोदींवर टाकली टीकेची गेम!!
- लता मंगेशकरांनी पटेल, नेहरूंची गाणीही गायिली नाहीत बाळासाहेब आंबेडकर यांचे वक्तव्य
- गोवा मुक्तीचा लढा; अमेरिकेने घातला होता नेहरूंना खोडा!!