• Download App
    मुंबईसह ठाणे-कल्याणमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार; राज्यात परतीच्या पावसाने घातला जोरदार धुमाकूळ । Heavy rains with thunderstorms in mumbai thane area

    मुंबईसह ठाणे-कल्याणमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार; राज्यात परतीच्या पावसाने घातला जोरदार धुमाकूळ

    वृत्तसंस्था

    मुंबई : कल्याण-डोंबिवलीसह अंबरनाथमध्ये मेघागर्जनेसह जोरदार पाऊस कोसळत आहे. विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. लोकल वाहतूकीला पावसाचा फटका बसला आहे. कल्याण ते कसारा दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली आहे.  Heavy rains with thunderstorms in mumbai thane area

    दरम्यान, पुणे शहरात कात्रज, सहकारनगर, शिंदे हायस्कुल, अरणेश्वर, मित्रमंडळ चौक, सिंहगड रस्ता, एरंडवणा येथे २० झाडे कोसळली.
    यंदा मान्सून लांबला. समाधानकारक पाऊस झाला. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीही निर्माण झाली होती. त्यामुळे मोठे नुकसानही झाले. राज्यात पाणीसाठाही उपलब्ध आहे. आता मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. जाता जाता पावसाने जोरदार तडाखा दिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.



    येत्या काही तासांत परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पश्चिम राजस्थान, संलग्न गुजरातच्या काही भागातून सुरुवात देखील झाली आहे.

    Heavy rains with thunderstorms in mumbai thane area

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !