विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र विधीमंडळ अर्थसंकल्पाच्या आजच्या समारोपाच्या दिवशी विधानसभा सभागृहात पुणे मेट्रोपोलिटन रिजन (PMR) च्या सर्वांगीण विकासाबाबत माझी भूमिका ठामपणे मांडली. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली पुणे महानगर क्षेत्र अर्थात ’’PMR’’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. मेट्रो विस्तार, रिंगरोड, मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट, नदी संवर्धन आणि औद्योगिक सुविधा यामध्ये उल्लेखनीय प्रगती होत आहे.
तथापि, हा विकास अधिक शाश्वत आणि परिणामकारक होण्यासाठी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे शासनाचे लक्ष वेधले:
– मेट्रो व रिंगरोड प्रकल्पांची कालबद्ध अंमलबजावणी
– नदी प्रदूषण नियंत्रण आणि सांडपाणी व्यवस्थापनाची क्षमता वाढविणे
– अनियोजित विकासावर नियंत्रण व एकात्मिक विकास आराखडा
– एमआयडीसी आणि औद्योगिक सुविधांचा दर्जा उंचावणे
– महावितरणवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी ऊर्जा आणि नवीन उपकेंद्रे निर्माण करणे
– पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून नवीन जलस्त्रोत निर्मिती करणे
– श्रीक्षेत्र देहू, आळंदी, भीमाशंकर आणि वढू तुळापूर येथील विकास आराखडा
– नीती आयोगाची ४०००० कोटींच्या निधीला मान्यता
PMR चा विकास हा केवळ वेगाने नव्हे, तर शाश्वत आणि सर्वसमावेशक पद्धतीने व्हावा, यासाठी शासनाने ठोस व कालबद्ध कृती आराखडा राबवावा, अशी आग्रही मागणी केली. यावर राज्याच्या मंत्री माधुरीताई मिसाळ यांनी सभागृहात सकारात्मक उत्तर दिले. PMR अर्थात पुणे महानगर क्षेत्रासाठी ‘‘ग्रोथ हब प्लॅन’’ आहे. त्यासाठी निती आयोगाकडून ४००००कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे, असे सांगितले.
Growth Hub Plan for the Pune Metropolitan Region (PMR)
महत्वाच्या बातम्या
- Kim Jong Un : किम जोंग म्हणाले- अणुबॉम्ब ठेवण्याचा निर्णय योग्य होता; इराणवरील हल्ल्याने आम्हाला सत्य सिद्ध केले
- 35 दिवसांनी गॅस सिलेंडर मिळायची अफवा; सरकारचा स्पष्ट शब्दांत खुलासा!!
- अहिंसेच्याच्या नावाखाली काँग्रेसने हिंदूंना दुबळे आणि घाबरट बनविले; हिंदू संमेलनात शरद पोंक्षेंचे टीकास्त्र
- Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची प्रकृती काल रात्री अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल