विशेष प्रतिनिधी
पुणे : पिंपरी – चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील प्रस्तावित जागेत त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारकाचे आज भूमिपूजन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या लढ्याला खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. या निमित्ताने तमाम पिंपरी-चिंचवडकरांसाठी आजचा दिवस अभिमानाचा आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्री. भीमराव यशवंत आंबेडकर, महापौर श्री. रवि लांडगे, आमदार श्री. महेश लांडगे, आमदार श्री. शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार श्री. अमित गोरखे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे, सत्तारुढ पक्षनेते श्री. प्रशांत शितोळे, नगरसेवक श्री. कुणाल वाव्हळकर, नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी व विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेबांच्या कठीण काळात त्यांची सावली माता रमाईंना त्यांना खंबीर साथ दिल्यानेच बाबासाहेब हे अस्पृश्यांच्या जीवनोत्थानासाठी कार्य करू शकले. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करताना रमाईंनी भोगलेल्या गरिबीच्या चटक्यांचा, प्रसंगी आपल्या इच्छा, अपेक्षांच्या दिलेल्या आहुतीला विसरता येणार नाही. महाराष्ट्रातील माता रमाईंचे हे भव्य स्मारक भावी पिढ्यांना दिशा देईल, असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.
Groundbreaking Ceremony for the Ramai Ambedkar Memorial in Pimpri
महत्वाच्या बातम्या
- ममतांच्या प्रचारासाठी फक्त केजरीवाल; बाकीचे प्रादेशिक नेते गपगार!!
- FM Araghchi ; इराणचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पाकिस्तान दौऱ्यावर; दोन दिवसांतील दुसरा दौरा
- मुंबई – पुणे मिसिंग लिंक महाराष्ट्र दिनी नागरिकांच्या सेवेसाठी खुला; घाटातल्या वाहतूक कोंडीला कायमचा आळा!!
- K. Kavitha : तेलंगणात नवा राजकीय ट्विस्ट: कविता यांचा स्वतंत्र पक्ष, केसीआरसमोर घरातूनच आव्हान
Sadavarte : परिवहन खातं पंक्चर झालं का? गुणरत्न सदवार्तेंचा प्रताप सरनाईकांसह राज ठाकरेंवर निशाणा