• Download App
    Give 100% Compensation To Farmers, Jarange Patil Warns शेतकऱ्यांना 100% नुकसानभरपाई द्या; अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय नाही,

    Jarange Patil : शेतकऱ्यांना 100% नुकसानभरपाई द्या; अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांचा इशारा

    Jarange Patil

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : Jarange Patilमहाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्याला अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. दुष्काळी भाग समजला जाणारा मराठवाडा पूराने वेढला गेला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अशात मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पावसामुळे नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील चिंचपुर ढगे व पिंपळगाव येथे भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारने निकष न लावत जेवढे नुकसान झाले आहे, तेवढी मदत द्यावी. अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा दिला आहे.Jarange Patil

    मनोज जरांगे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त चिंचपुर ढगे तसेच पिंपळगाव परिसरात भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. तसेच त्यांना धीर देण्याचे देखील काम त्यांनी केले. तसेच जेवढे नुकसान झाले तेवढी मदत द्यावी, अन्यथा महाराष्ट्र बंद करण्यात येईल, असा इशारा सरकारला दिला आहे. मदतीसाठी जनावरांचे मृतदेह लागतील अशा अव्यवहार्य अटी रद्द करून शेतकऱ्यांना तात्काळ 100 टक्के आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.Jarange



    सरकारने तात्काळ मदतकार्य सुरू करावे

    पिंपळगाव येथील आत्माराम दातखिळे यांना धीर देताना म्हटले की, शेतमालाचे नुकसान, जनावरांचे मृत्यू, घरांचे झालेले नुकसान या साऱ्या गोष्टी गंभीर आहेत. सरकारने तात्काळ मदतकार्य सुरू करून शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे करताना 50 टक्के, 60 टक्के असे करू नका, असे आवाहन जरांगे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना केले आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे देखील जरांगे यांनी सांगितले.Jarange

    दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभे पीक आडवे झाले आहे, तर काही ठिकाणी तर पिकांचा अक्षरशः चिखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांच्या शेतांमध्ये तर कमरेएवढे पाणी साचले असून शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे सरकारकडून तातडीने मदतीची याचना शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

    सर्वच पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी सरकारची मदत मिळेल- मुख्यमंत्री

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, सर्वच पीडित नागरिकांना दिवाळीपूर्वी सरकारची मदत मिळेल असे स्पष्ट केले. ते म्हणाले, काल सरकारने 2 हजार कोटी रुपयांचा निधी जारी केला. सरकार या संदर्भात शेतकऱ्यांना मदत करेलच. पण सोबतच ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांचेही नुकसान भरून दिले जाईल. अन्नधान्याचे नुकसान झालेल्यांनाही मदत केली जाईल. कोणतेही अधिकचे निकष न लावता गरजेनुसार निकष शिथील करून नागरीक केंद्रीत मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आपत्ती सुरू असताना सरकारने निधी रिलीज करणे सुरू केले आहे. त्यानुसार दिवाळीपूर्वी सर्वांना मदत मिळेल.

    Give 100% Compensation To Farmers, Jarange Patil Warns

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Manoj Jarange : अतिवृष्टीच्या संकटातही मनोज जरांगे यांचे राजकारण, महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा

    महाराष्ट्र ओल्या दुष्काळात बुडाला तरी राजकारण सुटत नाही; दमबाजी करण्याची हौस काही भागत नाही!!

    निकष आणि नियमांचा अडथळा न आणता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी सर्व मदत; शेतीच्या बांधावरून मुख्यमंत्र्यांची घोषणा