• Download App
    Minister Girish Mahajan Defends Radhakrishna Vikhe Patil, Says Maratha Reservation GR Was Collective Committee Decision; Decries Personal Targeting by Bhujbal मराठा आरक्षणाच्या जीआरचा निर्णय सरकारचा

    Girish Mahajan : मराठा आरक्षणाच्या जीआरचा निर्णय सरकारचा; कोणाला टार्गेट करणे योग्य नाही, भुजबळांच्या टीकेनंतर विखेंच्या साथीला गिरीश महाजन

    Girish Mahajan

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : Girish Mahajan  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील महाएल्गार सभेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तिखट टीका केली होती. विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला, असे भुजबळ म्हणाले होते. आता यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत राधाकृष्ण विखे पाटलांची बाजू घेतली. जीआरचा निर्णय हा वैयक्तिक नसून समितीचा सामूहिक निर्णय होता. त्यामुळे कोणालाही टार्गेट करणे योग्य नाही, असे गिरीश महाजन म्हणाले.Girish Mahajan

    मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात बीडमध्ये शुक्रवारी ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. विखे पाटील गरज नसताना मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे वारंवार भेटीगाठीसाठी जातात. जरांगे-पाटील यांच्याशी वारंवार भेटणाऱ्या विखेंना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजप नेत्यांना दिला होता.Girish Mahajan



    नेमके काय म्हणाले गिरीश महाजन?

    जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात जो जीआर काढण्यात आला, तो निर्णय एकट्या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचा नाही. तो समितीचा सामूहिक निर्णय आहे. सरकार म्हणून तो निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे कोणाला टार्गेट करणे योग्य नाही.

    ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला महत्त्व नाही

    यावेळी गिरीश महाजन यांना उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्याबद्दल विचारले असता, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला मी महत्त्व देत नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यांना एकत्र येऊ द्या, एकत्र येऊन फटाके फोडू द्या, त्यात काही वावगे नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणीही एकत्र आले तरी भाजप आणि महायुतीचाच विजय होईल, यात शंका नाही, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

    विजय वडेट्टीवारांसह काँग्रेसवर टीका

    यावेळी गिरीश महाजन यांनी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही टीका केली. “आम्ही (महायुती) आमच्या फॅक्टरीमध्ये एक आहोत, पण त्यांच्या काँग्रेसमध्येच चार नेते चार वेगवेगळ्या कोपऱ्यावर आहेत. त्यांच्याच पक्षातील नेत्यांची तोंडे एका दिशेला नाहीत. त्यामुळे त्यांनी आमच्यावर टीका करू नये,” असे म्हणत त्यांनी काँग्रेसमध्ये एकमत नसल्याचा दावा केला.

    Minister Girish Mahajan Defends Radhakrishna Vikhe Patil, Says Maratha Reservation GR Was Collective Committee Decision; Decries Personal Targeting by Bhujbal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pankaja Munde : बीडच्या ओबीसी मेळाव्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या- भुजबळांनी याआधीही असे मेळावे घेतलेत, त्यांनी त्यांची बाजू मांडली असावी

    Vijay Wadettiwar : भुजबळांच्या व्हिडिओवर वडेट्टीवारांचा पलटवार; ते ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवणाऱ्या फॅक्टरीत काम करतात- विजय वडेट्टीवार

    Chhagan Bhujbal : भुजबळांचा जामीन रद्द होऊ शकतो; ठाकरे गटाने व्यक्त केला संशय; मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य नसेल तर राजीनामा देण्याचा सल्ला