• Download App
    Ganja smuggling in Pawar's Baramati; 634 kg of ganja worth Rs 3 crore seized; 7 smugglers arrested!! पवारांच्या बारामतीत गांजाची तस्करी; तब्बल ६३४ किलो गांजासह ३ कोटींचा मुद्देमाल जप्त; ७ तस्करांना अटक!!

    पवारांच्या बारामतीत गांजाची तस्करी; तब्बल ६३४ किलो गांजासह ३ कोटींचा मुद्देमाल जप्त; ७ तस्करांना अटक!!

    Baramati

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या परिवाराने विकसित केलेल्या बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्ती आणि ड्रग्स तस्करी वाढल्या असल्याचे दिसून येत असून पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामती मध्ये धडक कारवाई करून गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.Ganja smuggling in Pawar’s Baramati; 634 kg of ganja worth Rs 3 crore seized; 7 smugglers arrested!!

    या संदर्भात कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलवर ट्विट करून खुलासा केला.



    – रोहित पवारांचे ट्विट असे :

    बारामतीतील गुन्हेगारी आणि ड्रग्जसंदर्भात नुकतीच पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल साहेब यांची भेट घेऊन यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामतीत गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करत ६३४ किलो गांजासह ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यात ७ जणांना अटक केली आहे.

    – मोठे रॅकेट असण्याची शक्यता

    पोलिसांची ही कारवाई निश्चितच स्वागतार्ह आहे. पण बारामतीत वाढत असलेल्या या दोन नंबरच्या धंद्याचा पोलिसांनी अधिक सखोल तपास केला, तर आणखी खूप मोठं रॅकेट उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. शिवाय वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यापाराप्रमाणेच डोकं वर काढत असलेली गुन्हेगारीही पोलिसांनी मोडीत काढावी, ही विनंती!

    Ganja smuggling in Pawar’s Baramati; 634 kg of ganja worth Rs 3 crore seized; 7 smugglers arrested!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राहुल गांधींचे रात्री आंदोलन; अमित शाह यांच्या घरावरून पोहोचले गांधी स्मृतीस्थळावर!!; INDI आघाडीतल्या घटक पक्षांची राहुल गांधींच्या नेतृत्वामागे फरफट!!

    Supreme Court : ठाकरेंना सुप्रीम कोर्टातून दिलासा नाही; 6 खासदारांच्या विलीनीकरणाला स्थगिती देण्यास नकार, लोकसभा अध्यक्षांना नोटीस

    धर्मेंद्र प्रधानांची खुर्ची खुंटा हलवून बळकट; पण त्याच वेळी पेपर फुटीचे गुन्हेगार अडकणार फास्ट ट्रॅक कोर्टात!!