• Download App
    चार वर्षांच्या ऋग्वेदाचा विक्रम ; इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये झाली नोंद । Four-year Rig Veda record; Recorded in the International Book of Records

    चार वर्षांच्या ऋग्वेदाचा विक्रम ; इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये झाली नोंद

    इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झाल्यामुळे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते ऋग्वेदाचा सत्कार करण्यात आला. Four-year Rig Veda record; Recorded in the International Book of Records


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील ऋग्वेदाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झाली आहे.ऋग्वेदा सागर विरकर ही अवघ्या ४ वर्षांची मुलगी आहे. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झाल्यामुळे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते ऋग्वेदाचा सत्कार करण्यात आला.

    ऋग्वेदाचा अनोखा विक्रम

    ऋग्वेद मानवी शरीर रचना, विज्ञान, यामध्ये सांगाडा प्रणाली, मानवी शरीरातील हाडांची नावे, पचनसंस्था व त्यांच्या ग्रंथी उत्सर्जन संस्था, श्वसन प्रणाली, मज्जासंस्था आणि मानवी दातांचे प्रकार सांगून अनोखा विक्रम प्रस्थापित केला.ऋग्वेदा एक मिनिटे २१ सेकंदात अनेक देशांची नावे आणि त्यांच्या राजधान्यांची अचूक माहिती सांगते तसेच अवघ्या ४ मिनिटे आणि ५६ सेकंदात भारतातील राज्य व केंद्रशासीत प्रदेश यांची नावे व राजधान्यांची माहिती सांगते.



    ऋग्वेदाचे यश

    ऋग्वेदाने तीन स्पर्धेत प्राविण्य मिळवून १२ करंडक १८ पदके आणि ४१ प्रशस्तीपत्रके मिळविली आहेत. ऋग्वेदाच्या अनोख्या विक्रमाचा कार्यक्रम ‘युनिक गर्ल ऑफ इंडीया’ या युट्यूब चॅनलला लाखो फॉलोअर्स आहेत. ऋग्वेदाच्या पालकांनी ऋग्वेदाला भविष्यात अंतराळवीर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

    Four-year Rig Veda record; Recorded in the International Book of Records

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Girish Mahajan : गिरीश महाजन यांचे बनावट ‘AI’ फोटो व्हायरल करणारा गजाआड; सायबर पोलिसांची कारवाई, मोबाईल जप्त आणि फेसबुक खातेही कायमचे बंद

    Gunaratna Sadavarte : शिवाजी पार्कवर आंदोलन करणे बेकायदेशीर; गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरेंच्या आंदोलनावर आक्षेप, कारवाईची केली मागणी

    Shrikant Shinde : उद्धव ठाकरे कधी जमिनीवर आलेच नाहीत, आता काय येणार? श्रीकांत शिंदेंचा टोला