• Download App
    शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्वागतार्ह रॅली, चाळीसगाव येथे खासदार, आमदार आणि नगराध्यक्ष यांच्यासह पाच हजार जणांवर गुन्हा|Five thousand people including MP, MLA and Mayor at Chalisgaon charged for welcome rally for Shivaji Maharaj's statue

    शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्वागतार्ह रॅली, चाळीसगाव येथे खासदार, आमदार आणि नगराध्यक्ष यांच्यासह पाच हजार जणांवर गुन्हा

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्वागतासाठी काढलेल्या रॅलीमुळे सोशल डिस्टन्स निकषांचा भंग केल्याप्रकरणी चाळीसगाव येथे खासदार, आमदार आणि नगराध्यक्ष यांच्यासह पाच हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Five thousand people including MP, MLA and Mayor at Chalisgaon charged for welcome rally for Shivaji Maharaj’s statue

    चाळीसगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे रविवारी जल्लोषात आगमन झाले. या स्वागत रॅलीत आपत्ती व्यवस्थापन आदेशाचे उल्लंघन तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळणे आणि मास्क न लावण्याप्रकरणी खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह पाच हजार नागरिकांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



    रविवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या आगमन व स्वागतानिमित्त बिलाखेड ते शहरातील सिग्नल चौकापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्क न लावणे व जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. यावरुन खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण,

    माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह चार ते पाच हजाराच्या जनसमुदायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.

    Five thousand people including MP, MLA and Mayor at Chalisgaon charged for welcome rally for Shivaji Maharaj’s statue

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ