• Download App
    शेतकऱ्यांना वीज बिल भरावेच लागेल ; राज्य ऊर्जामंत्री नितीन राऊत | Farmers have to pay electricity bills; Minister of State for Energy Nitin Raut

    शेतकऱ्यांना वीज बिल भरावेच लागेल ; राज्य ऊर्जामंत्री नितीन राऊत

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : शेतकर्यांनी लवकरात लवकर वीज बिल भरावे यासाठी राज्यात कृषि पंप वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम सुरू आहे. गहू ज्वारी हरभरा ऊस या पिकांची पेरणी झालेले असताना शेतकर्यांना पाणी अत्यावश्यक आहे. या पाश्र्वभूमीवर वीज कनेक्शन कट केले जात आहे. यासंबंधी भाजपने राज्य सरकारच्या कृती विरूध्द आवाज उठवला आहे.

    Farmers have to pay electricity bills; Minister of State for Energy Nitin Raut

    याला उत्तर देताना राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे की, वीजनिर्मिती करण्यासाठी कोळसा लागतो. पैसा लागतो. त्यासाठी कर्ज काढावे लागते. त्यानंतर वीजनिर्मिती केली जाते. महावितरण विभागावर आधीच 56 हजार कोटींचा बोजा आहे. भाजपच्या काळामध्ये त्यांनी लोकांना सवय लावून ठेवली आहे. इतका खर्च वीज निर्मितीसाठी होत असेल तर वीज फुकट कशी द्यायची? आणि जर तुम्ही वीज वापरता तर तुम्ही बिल भरायला पाहिजे. वीज बिल भरावे लागेल नाहीतर फार तर सवलत मिळेल. असे त्यांनी म्हटले आहे.


    शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद ; 2.52 कोटी थकबाकी विज बिलाची किंमत जमा


    उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपशासित राज्यांना जीएसटी परतावा दिला जातो. व महाराष्ट्राला का नाही? असा प्रश्नदेखील नितीन राऊत यांनी यावेळी विचारला आहे.

    पुढे ते म्हणतात, क्रूड ऑइलचे दर कमी असतानादेखील केंद्र सरकारकडून इंधनाचे दर कमी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत.

    Farmers have to pay electricity bills; Minister of State for Energy Nitin Raut

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!