• Download App
    धुळे सोलापूर महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला; तीस गावांच्या अतिवृष्टीच्या अनुदानासाठी आक्रमक |Farmers block Dhule-Solapur highway; Aggressive for overgrown grants of thirty villages

    WATCH : धुळे सोलापूर महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला; तीस गावांच्या अतिवृष्टीच्या अनुदानासाठी आक्रमक

    विशेष प्रतिनिधी

    बीड : अतिवृष्टीच्या अनुदानासाठी बीड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला होता.अतिवृष्टी होऊन देखील बीड तालुक्यातील मांजरसुंबा महसूल मंडळातील तीस गाव अनुदानापासून वंचित ठेवण्यात आली आहेत.Farmers block Dhule-Solapur highway; Aggressive for overgrown grants of thirty villages

    त्यामुळे या गावांचा अनुदानाच्या यादीत समावेश करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आलीय. दरम्यान या रास्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यांसह भाजप कार्यकर्ते सामील झाले होते. जवळपास अर्धा तास या महामार्गावरील वाहतुक रोखल्याने औरंगाबाद आणि अंबाजोगाईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.



    महसूल मंडळाच्या लेखी आश्वासनानंतर तूर्तास हे आंदोलन थांबवण्यात आले असले तरी मागणी मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

    • धुळे सोलापूर महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला
    • अतिवृष्टीच्या अनुदानासाठी आक्रमक
    • आंदोलनात शेतकऱ्यांसह भाजप कार्यकर्ते
    • अर्धा तास महामार्गावरील वाहतूक ठप्प
    • औरंगाबाद, अंबाजोगाईकडे जाणारी वाहतूक ठप्प
    • लेखी आश्वासनानंतर आंदोलन थांबवण्यात आले

    Farmers block Dhule-Solapur highway; Aggressive for overgrown grants of thirty villages

     

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!