पुणे पोलिसांना 25 लाखांचा पुरस्कार जाहीर केला
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहर पोलिस दलाने अंमली पदार्थ जप्तीच्या केलेल्या विक्रमी कामगिरीबद्दल पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन व कौतुक केले. यावेळी खासदार मेधाताई कुलकर्णी व पुणे शहर पोलिस दलाचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.Fadnavis praises Pune police for record action against drugs
याप्रसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सुमारे 3700 कोटींचा एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत करण्याचे काम पुणे पोलिसांनी केले. राज्य शासन गेले काही महीने सातत्याने ‘ड्रग्स फ्री महाराष्ट्र’ मोहीम राबवत आहे. केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात देशात ‘ड्रग्स फ्री इंडिया‘ची मोहीम राबविली जात आहे. अंमली पदार्थ तरुणाईला उध्वस्त करण्याचे काम करत आहेत. म्हणून याविरुद्ध एकत्रितपणे लढाई लढणे गरजेचे आहे. नुकत्याच झालेल्या गुन्हे परिषदेत ड्रग्स विरोधात ‘झीरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारण्याची केलेली सूचना सर्व पोलिस युनिट्सने गांभीर्याने घेतली याचा आनंद आहे.’
याचबरोबर ‘या कारवाईने आपल्या सर्वांचे डोळे उघडले जावेत, एवढा साठा यावेळी जप्त करण्यात आला. हा साठा शेवटच्या उपभोक्त्यापर्यंत पोहोचला असता तर असंख्य घरे उद्ध्वस्त झाली असती. यावरून एमडीसारखे अंमली पदार्थ कारखाने सुरू करून एमडी बनवण्याचे काम असल्याचे दिसून येते. कुरीयर, डार्क नेटचा तसेच समाज माध्यमांचा वापर करून छोट्या छोट्या प्रमाणात यांच्या पुरवठ्याचा आकार असल्याने ते शोधून काढणे कठीण होते.’
तसेच ‘यामुळे ही एक कारवाई करून थांबता येणार नाही, यावरून अशा प्रकारचा छोटासा साठा जरी सापडला तरीही त्याचा पाठपुरावा करून त्याचे धागेदोरे शोधून काढणे गरजेचे आहे हे लक्षात येते. यावर सर्व पोलिस यूनिट चांगले काम करतील असा विश्वास आहे. या विक्रमी कारवाईबद्दल पुणे पोलिसांना 25 लाखांचा पुरस्कार यावेळी जाहीर केला.’
ड्रग्स विरोधात भविष्यातही नव्या जोमाने अशीच लढाई लढत राहू हा विश्वास आहे ! पुन्हा एकदा पुणे पोलीस दलाचे खूप खूप अभिनंदन ! मला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे ! असं फडणवीस म्हणाले आहेत.
Fadnavis praises Pune police for record action against drugs
महत्वाच्या बातम्या
- नाट्यसंस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात ७५ नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार – मुख्यमंत्री शिंदे
- हल्दवानी हिंसाचाराचा मास्टरमाइंड अब्दुल मलिकला दिल्लीतून अटक
- 40 वर्षांनंतर पवारांना आत्ता रायगड आठवला!!; फडणवीस + राज ठाकरेंचा निशाणा
- अखिलेश यादव राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सामील होणार, पण तिला PDA यात्रा म्हणणार!!