विशेष प्रतिनिधी
मुंबई : Fadnavis मुंबईतील कबुतरखान्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, पहिल्यांदा लोकांचे आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि आरोग्याचे रक्षण झालेच पाहिजे. त्याचसोबत काही आस्थेचे विषय आहेत त्याची पण आपण काळजी घेऊ शकतो. त्यातून आपण मार्ग काढू शकतो. समाजाचे आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टीचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. तसेच हा वादाचा मुद्दा नसून हा समाजाचा प्रश्न असल्याचे फडणवीस म्हणाले.Fadnavis
आरोग्याला दुर्लक्षित करता येत नाही
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिथे मनुष्य नसतील, वस्ती नसेल अशा जागांवर कबुतरखाने बनवण्याचा विचार करण्यात येईल. आरोग्याला दुर्लक्षित करता येत नाही. मुळात हा वादाचा मुद्दा नाहीच. परंतु, काही लोक यात आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राजकारण करत आहेत. एका समाजाच्या विरोधात दुसऱ्या समाजात तेढ निर्माण करणे, भाषेवरून वाद निर्माण करणे असे चालू आहे, पण ते यशस्वी होणार नाही.Fadnavis
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा मांसाहारावर बंदी होती
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अनेक जिल्ह्यात मांसाहारावर बंदीचा निर्णय महापालिकांनी घेतला आहे. या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे. या प्रकरणावर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, असा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. 1988 सालापासून हा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात लागू आहे. अनेक महानगरपालिकांना मी विचारले की असा निर्णय का घेतला, त्यावेळी त्यांनी 88 चा जीआर दाखवला. अगदी म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील असा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारला कोणी काय खावे हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही
सरकारला कोणी काय खावे हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही. आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत. त्यामुळे विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि त्यावर आज असे वादंग निर्माण करायचे की आमच्या सरकारने निर्णय घेतला. काही लोक इथपर्यंत पोहोचले की शाकाहारी खाणाऱ्यांना ते नपुंसक म्हणायला लागले. हा मूर्खपणा बंद केला पाहिजे. ज्याला जे खायचे तो ते खात आहे. संविधानाने प्रत्येकाला जे काही करायचे ते करण्याचा अधिकार आहे.
शरद पवार सरकारनेच कत्तलखाने बंदीचा निर्णय आणला:भाजपचा आरोप; आव्हाड, आदित्य ठाकरेंना पवारांवर टीका करण्याचा सल्ला
15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयावरून भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार पलटवार केला आहे. 15 ॲागस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय हा महायुती सरकारने घेतलेला नाही. हा निर्णय 12 मे 1988 रोजी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना व काँग्रेस सत्तेत असताना घेण्यात आला होता. त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली, असे भाजपने म्हटले आहे.
Fadnavis Pigeon Feed Controversy Public Health Priority
महत्वाच्या बातम्या
- रोहित पवारांनी पाजळली “राजकीय “विद्वत्ता”; 41 आमदारांचा पक्ष 10 आमदारांच्या पक्षात विलीन करायची केली सूचना!!
- Semiconductor : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; सरकार 4,594 कोटी रुपये गुंतवणार
- Asim Munir : माजी अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले- असीम मुनीर सूट घालणारा लादेन; पाक लष्करप्रमुखांनी दिली होती अणुहल्ल्याची धमकी
- India China : पुढील महिन्यापासून भारत-चीनदरम्यान थेट विमानसेवा; अहवालात दावा- भारताने विमान कंपन्यांना तयारी करण्यास सांगितले