• Download App
    Fadnavis Government: Flood Relief Starts, 4 Lakh Aid, Collectors Get Full Powers फडणवीस सरकारची अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत सुरू, मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख, जिल्हाधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार

    Fadnavis : फडणवीस सरकारची अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत सुरू, मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख, जिल्हाधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार

    Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Fadnavis राज्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला असून, सुमारे 84 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पीडितांना तातडीची मदत देण्यास सुरुवात केली आहे.Fadnavis

    मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत

    सरकारने स्पष्ट केले आहे की पावसाशी संबंधित दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला ४ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. ही रक्कम अवघ्या ८ दिवसांत थेट पीडितांच्या बँक खात्यात जमा होत आहे.Fadnavis

    सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात पुरामुळे चार जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापन विभागाने एकूण १६ लाख रुपयांची मदत देऊन त्यातील तिघांच्या कुटुंबीयांच्या खात्यात रक्कम जमा केली असून, उर्वरित कुटुंबाला लवकरच मदत मिळणार आहे.Fadnavis



    जिल्हाधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार

    सरकारने मदत वाटपाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. ज्या जिल्ह्यांत निधी कमी असेल, तिथे “उणे बजेट” वापरण्याची परवानगीही दिली आहे.

    जनावरांच्या मृत्यूसाठी भरपाई

    पावसामुळे अनेक जनावरे दगावली आहेत. त्यासाठी सरकारने खालीलप्रमाणे मदत जाहीर केली आहे –

    * दुधाळ जनावरासाठी – ३७,५०० रुपये
    * ओढ काम करणाऱ्या जनावरासाठी – ३२,००० रुपये
    * लहान जनावरासाठी – २०,००० रुपये
    * शेळी, मेंढी, बकरे, डुक्कर यांसाठी – प्रत्येकी ४,००० रुपये

    मोठ्या जनावरांची कमाल मर्यादा ३, तर लहान जनावरांची मर्यादा ३० इतकी ठेवण्यात आली आहे.

    कुक्कुटपालन शेतकऱ्यांना मदत

    पहिल्यांदाच कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत जाहीर करण्यात आली आहे.
    * प्रतिकोंबडी – १०० रुपये
    * एका कुटुंबाला जास्तीत जास्त – १०,००० रुपये

    घर व गोठा पडझडीसाठी मदत

    * झोपडी पडल्यास – ८,००० रुपये
    * पक्के घर पडल्यास – १२,००० रुपये
    * गोठा पडल्यास – ३,००० रुपये

    पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई

    शेतकऱ्यांच्या पिकांच्या हानीसाठी खालीलप्रमाणे मदत ठरवण्यात आली आहे –

    * कोरडवाहू पिके – प्रतिहेक्टर ८,५०० रुपये
    * बागायती पिके – प्रतिहेक्टर १७,००० रुपये
    * बहुवार्षिक पिके – प्रतिहेक्टर २२,५०० रुपये

    पुरामुळे जमीन खरडून गेल्यास –
    * दुरुस्त होऊ शकणारी जमीन – प्रतिहेक्टर १८,००० रुपये
    * पूर्ण दुरुस्त न होणारी जमीन – किमान ५,००० रुपये ते कमाल ४७,००० रुपये

    राज्यातील शेतकरी व पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत मिळावी यासाठी सरकारकडून जलद हालचाली सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना थेट बँकेत मदत पोहोचवली जात आहे, तसेच जनावरांचे, पिकांचे, घरांचे नुकसान लक्षात घेऊन आर्थिक मदतीची रूपरेषा आखण्यात आली आहे.

    Fadnavis Government: Flood Relief Starts, 4 Lakh Aid, Collectors Get Full Powers

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Fadnavis : NDRF मधून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव मदत द्यावी; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री शहांकडे मागणी

    Sameer Wankhede : समीर वानखेडेंची हायकोर्टात याचिका, म्हणाले- आर्यन खानच्या सिरीजमध्ये माझी बदनामी, 2 कोटींच्या भरपाईची मागणी

    State Government : महाराष्ट्रात पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारचा दिलासा; मृतांच्या वारसांना ४ लाख, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई