• Download App
    Fadnavis Bihar Victory Congress Poisonous Campaign MIM Down Photos Videos Interview बिहारचा निकाल काँग्रेसच्या विषारी प्रचाराला जनतेचे उत्तर;

    Fadnavis : बिहारचा निकाल काँग्रेसच्या विषारी प्रचाराला जनतेचे उत्तर; मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला- काँग्रेस पक्ष MIMच्याही खाली गेला

    Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Fadnavis  बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीए आघाडीवर असून जवळपास विजय हा निश्चितच झाल्याचे दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशात जो विषारी प्रचार चालवला आहे, त्याला जनतेने उत्तर दिल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्ली येथे असून पत्रकारांशी संवाद साधताना बिहार निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.Fadnavis

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप आणि एनडीए या सर्व घटक पक्षांच्या बिहार युनिटचे मी अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचे आभार मानतो. त्यांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, नितीश कुमार यांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एनडीएच्या माध्यमातून प्रचंड मोठे बहुमत दिले आहे. 2010 चा सुद्धा रेकॉर्ड तुटू शकेल इतके बहुमत मिळाले आहे.Fadnavis



    कॉंग्रेस एमआयएम पेक्षाही खाली गेली

    पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, दुसरे महत्त्वाचे असे आहे की या विजयानंतर खऱ्या अर्थाने कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशात जो विषारी प्रचार चालवला आहे, त्याला जनतेने उत्तर दिले आहे. सातत्याने संवैधानिक संस्थांचा अपमान करणे, जनतेच्या मॅनडेटला विरोध करणे, कुठेतरी जनतेला हे लक्षात येत आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो हा त्या सरकारचा अपमान नाही तर आमच्या मताचा अपमान आहे. कॉंग्रेस एमआयएम पेक्षाही खाली गेली आहे. मला असे वाटते की कॉंग्रेसचा बिहारच्या इतिहासात सर्वात कमी मत मिळाली आहेत.

    राहुल गांधी यांनी तिथे मतचोरी मुद्दा चालवला, त्यावर त्यांनी यात्रा काढली, नदीत उडी टाकली. पण लोकांचा विश्वास हा मोदींवर आणि नितीश कुमार यांच्यावर आहे. मला असे वाटते की जोपर्यंत कॉंग्रेस आणि त्यांच्यासोबतचे पक्ष जोपर्यंत आत्मपरीक्षण करत नाहीत तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    विरोधक सत्य पचवत नाहीत तोपर्यंत त्यांचा पराभव होत राहणार

    पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, विकास आणि सुशासन हाच प्रमुख मुद्दा ठरला आहे. आणि हे लक्षात येत होते की खूप चांगल्या परिस्थितीत एनडीए आहे. पूर्वीपेक्षा जास्त चांगली परिस्थिती यावेळी दिसून आली आहे. अक्षरशः त्याचा निकाल आज आपण पाहत आहोत. मला असे वाटत होते की आपण 160 च्या पुढे जाऊ, पण त्याही पेक्षा आपण पुढे गेलो आहोत. तसेच जोपर्यंत हे लोक सत्य पचवत नाहीत तोपर्यंत त्यांचा पराभव होत राहणार, असे म्हणत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

    बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार?

    बिहारच्या मुख्यमंत्री पदावर कोण येणार यावर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली आहे, आता मुख्यमंत्री पदासाठी आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. यात मला बोलण्याचा अधिकार नाही. अमित शहा यांनी देखील स्पष्टपणे सगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे मी त्यावर काही बोलू शकत नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

    राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

    महाराष्ट्र भूषण पुरस्कार संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा पुरस्कार राम सुतार जे अतिशय ज्येष्ठ शिल्पकार आहेत. देशभरात त्यांच्या एवढ्या मूर्ती कोणीच तयार केलेल्या नाहीत. त्यांनी 100 वर्ष वयाचे पूर्ण केले आहेत. आता लवकरच त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

    Fadnavis Bihar Victory Congress Poisonous Campaign MIM Down Photos Videos Interview

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बिहारमध्ये अब्रू पुरती गेली; त्यानंतर काका – पुतण्याला सुचली पश्चात बुद्धी!!

    Ambadas Danve : अंबादास दानवे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात, खासदार नरेश म्हस्केंचे वक्तव्य, शिंदे गटाकडून दानवेंना ऑफर

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सत्य पचवत नाहीत तोपर्यंत त्यांचा पराभव होत राहणार