• Download App
    आमने-सामने: सत्तेसाठी कायपण ! शिवसेनेच्या राऊतांनी गायले नेहरू-गांधी घराण्याचे गोडवे ; भाजपच्या पाटलांनी करून दिली हिंदुहृदयसम्राटांची आठवण।Face-to-face: Anything for power! Shiv Sena's Sanjay Raut praises Nehru-Gandhi family; BJP's Chandrakant Patil reminded the Balasaheb Thakrey

    आमने-सामने: सत्तेसाठी कायपण ! शिवसेनेच्या राऊतांनी गायले नेहरू-गांधी घराण्याचे गोडवे ; भाजपच्या पाटलांनी करून दिली हिंदुहृदयसम्राटांची आठवण

    मूळात सत्ता मिळविणं हेच अंतिम उद्दीष्ट मान्य करून आणि त्यासाठी विचारांना तिलांजली दिली गेली, त्याचवेळी जनतेला सगळं समजलं !


    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापुर : संजय राऊत जर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर चिंतन करायला बसले तर बाळासाहेब वरुन त्यांच्या थोबाडीत मारतील, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नेहरू -गांधी घरण्याचे गोडवे गात देश आज काँग्रसेच्याच पुण्याईवर उभा आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील  यांनी राऊतांना हिंदुहृदयसम्राटांची आठवण करून दिली. Face-to-face: Anything for power! Shiv Sena’s Sanjay Raut praises Nehru-Gandhi family; BJP’s Chandrakant Patil reminded the Balasaheb Thakrey

    मला संजय राऊत यांच्यावर टीका करायला आवडत नाही. मात्र, ते रोज काहीतरी बोलतात मग मलाही उत्तर द्याव लागतं, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.



    संजय राऊत काय म्हणाले?

    राहुल गांधी यांचं म्हणणं सरकारने गांभीर्यानं ऐकलं पाहिजे. सरकारची दोन वर्षे तर करोनामध्येच निघून गेली. देशासाठी अजून बरंच काही करणं बाकी आहे. गेल्या ६० वर्षातील पंडित नेहरु ते राजीव गांधी, नरसिंह राव यांच्यापर्यंतचा जो लेखाजोखा आहे त्याच पुण्याईवर देश चालत आहे. असं संजय राऊत यांनी सांगितलं.

    देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्षे गेली, पण पंडित नेहरुंपासून ते राजीव गांधीपर्यंत, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत जर आपण लेखाजोखा पाहिला तर हा देश उभा राहिलेला दिसतो. त्याच मागच्या पुण्याईवर आजही देश तरलेला आहे.

    या वक्तव्याचा चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला.ते रविवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या, ‘ हा देश अजूनही नेहरूंच्या पुण्याईवर चाललाय’, या वक्तव्याचा समाचार घेतला. संजय राऊत यांनी एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर चिंतन करायला पाहिजे. त्यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेबांना हा प्रश्न विचारावा. मग बाळासाहेब ठाकरेही वरुन संजय राऊतांच्या थोबाडीत मारतील.

    Face-to-face: Anything for power! Shiv Sena’s Sanjay Raut praises Nehru-Gandhi family; BJP’s Chandrakant Patil reminded the Balasaheb Thakrey

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल