• Download App
    महाराष्ट्रात कोरोनाचे रोज ४०० ते ७०० बळी, आजवर ९७ हजार जण मृत्युमुखी।Every day 400 death in Maharashtra due to corona

    महाराष्ट्रात कोरोनाचे रोज ४०० ते ७०० बळी, आजवर ९७ हजार जण मृत्युमुखी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात रोज ४०० ते ७०० च्या आसपास मृत्यू होत आहेत. गुरुवारी ३०० हून अधिक मृत्यूंची नोंद झाली. आजवर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ९७ हजारांहून अधिक आहे. यातील २,८३९ हून अधिक मृत्यू हे सहआजारांमुळे झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. Every day 400 death in Maharashtra due to corona

    राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट जाणवत आहे; तरीही मृतांचा आकडा वाढत असल्याबद्दल राज्य कोरोना मृत्यू विश्लेषण समितीने चिंता व्यक्त केली आहे. यातील निम्म्या मृतांची संख्या १५ फेब्रुवारीनंतर नोंदवली गेली आहे. हे आकडे दुसऱ्या लाटेतील असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.



    दरम्यान, देशभरातून झालेल्या मृत्यूंपैकी २० टक्क्यांहून अधिक मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक मृत्यू नोंदले गेले. मुंबईतील मृतांचा आकडा १४,९६५ इतका आहे. पुण्यात १२,७३७ मृत्यू नोंदले गेले. ठाण्यात ८,२५५ आणि नागपूरमध्ये ६,७८७ मृत्यूची नोंद झाली.

    संपूर्ण देशाच्या तुलनेत आजवर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आजवर जवळपास ५८ लाख जणांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली. गुरुवारी नोंदवलेल्या ३०७ मृत्यूंपैकी २२८ हे गेल्या एका आठवड्यातील होते.

    Every day 400 death in Maharashtra due to corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!