बराच राजकीय खल आणि मशक्कत करून आणलेले शिवसेना-भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकार… त्याने विधानसभेत जिंकलेले बहुमत… याचे जेवढे दुःख शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीला झालेले नाही, त्यापेक्षा जास्त दुःख मराठी माध्यमांना झालेले दिसते. त्यामुळेच वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून शिंदे फडणवीस सरकार कसे अस्थिर आहे, त्याच्यात कसा अंतर्विरोध आणि सुप्त संघर्ष आहे याच्या बातम्या तर मराठी माध्यमे रंगवून देतच आहेत, पण त्या पलिकडे जाऊन ज्यांच्या तथाकथित चाणक्यगिरीला शिंदे फडणवीस सरकारमुळे सुरुंग लागला त्यांच्या चाणक्यगिरीला महाराष्ट्रात पुनर्स्थापित करण्यासाठी मराठी माध्यमिक सरसावलेली दिसत आहेत. eknath shinde sharad pawar meets fake news
यातूनच काल रात्री सूत्रांच्या हवाल्याने एक पुडी सोडण्यात आली… रात्री म्हणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक “सिल्वर ओक”वर पोहोचले आणि त्यांनी शरद पवारांची भेट घेतली… ही भेट केवळ सदिच्छा होती. पण त्यामध्ये राजकीय चर्चा झालीच नसेल असे सांगता येत नाही. त्यामुळे आता शिंदे फडणवीस सरकारच्या राजकीय भवितव्याचे नेमके काय असेल??, याची चर्चा माध्यमांनी लगेच सुरू केली. या बातमीच्या जोडीला सिल्वर ओक मधला शिंदे – पवार भेटीचा फोटो जणू ताजाच आहे असे भासवून जोडण्यात आला.
– पुडी सोडण्याचे टाइमिंग!!
त्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळात मराठी माध्यमांना “अपेक्षित” असा धक्का बसला. एकतर शिंदे गटाचे आमदार इतके दिवस सुरत तिथून गुवाहाटी तिथून गोवा आणि नंतर मुंबई असे साधारण 15-20 दिवस फिरल्यानंतर हळूहळू आपापल्या मतदारसंघात पोहोचत असताना किंवा नुकतेच पोहोचले असताना शिंदे – पवार भेटीची बातमीची पुडी फोटोसकट सोडण्यात आली. त्यातही सत्तांतराचा रात्रीस खेळ चालेलला असल्यामुळे आणि त्यातही फडणवीसांचे वेशांतर गाजत असल्याने एकनाथ शिंदे यांनी “सिल्वर ओक”वर जाऊन पवारांची भेट रात्री घेतल्याच्या बातम्या सगळ्यांनाच खऱ्या वाटल्या. त्यामुळे शिंदे गटातले आमदारांची चलबिचल वाढली किंबहुना अशी चलबिचल वाढावी हाच तर बातमी आणि फोटो या संयुक्त पुडीच्या प्रयोगाचा हेतू होता.
– राजकीय हवेत 12 तास तरंगलेली पुडी
पण दस्तुरखुर्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून अशी कोणतीही भेट झाली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे जाहीर करून टाकले. मुख्यमंत्री कार्यालयाने देखील स्पष्टपणे इन्कार करून टाकल्याने बातमीतली सगळी हवा गेली. पण बातमीची पुडी मात्र महाराष्ट्राच्या राजकीय हवेत सुमारे 12 तास तरी तरंगत होती. या निमित्ताने महाराष्ट्रात मराठी माध्यमांची कोणती आणि कशी “इकोसिस्टीम” सुरू आहे हे दिसून आले!!
eknath shinde sharad pawar meets fake news
महत्वाच्या बातम्या
- रत्नागिरी जिल्ह्यात अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, पुराच्या धोक्यामुळे एनडीआरएफची टीम तैनात
- 75 % लोकसंख्या : झारखंडच्या गढवा मध्ये मुस्लिमांनी दबावाने बदलायला लावली शालेय प्रार्थना!!
- राम मंदिराच्या आंदोलनापासून ते उभारणीपर्यंत 500 वर्षांच्या इतिहासावर बनणार डॉक्युमेंट्री, पंतप्रधान मोदीही दिसणार
- द फोकस एक्सप्लेनर : व्हीप न पाळल्याबद्दल शिवसेनेच्या 14 आमदारांना नोटीस, जाणून घ्या, आदित्य ठाकरेंना सूट का दिली?