• Download App
    Eknath Shinde Orders Ministers: Monitor Ajit Pawar Funds अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा;

    Eknath Shinde : अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा; निधी कुठे वितरीत होतो याची माहिती घ्या, एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश

    Eknath Shinde

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Eknath Shinde अजित पवारांच्या खात्याकडे मोठा निधी आहे, त्यावर लक्ष ठेवा. तो निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या, असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची वेगळी बैठक घेतली. यात निधी वाटपावरून शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे.Eknath Shinde

    अजित पवार निधी देत नाहीत, अशी तक्रार शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी अनेकवेळा बोलून दाखवली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी देखील थेट आरोप केले होते. त्यामुळे निधी वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांमध्ये धुसफूस असल्याचे दिसून येते. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांसोबत वेगळी बैठक घेतली असल्याचे समजते.


    शिंदेंच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती तक्रार

    एकनाथ शिंदे निधी वाटपावरून आक्रमक झाल्याचे देखील पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या खात्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना दिले आहेत. अजित पवारांच्या खात्यात 14-14 हजार कोटींचे दोन निधी आहेत. त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. हा निधी कुठे वितरीत होतो याची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्यात निधी वाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. त्यापूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील पवारांची भेट घेतली होती. या भेटीत निधी वाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

    निधी वाटपावर भाजपचे आमदारही नाराज

    शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी अजित पवारांकडून निधी मिळत नसल्याची तक्रार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर निधी हा काही आपल्या खिशातून देत नाही, राज्यातील तिजोरीला शिस्त आणण्यासाठी काही पावले उचलली जातात असे अजित पवारांनी स्पष्ट केले होते. अजित पवारांच्या निधी वाटपावर केवळ शिंदे गटच नव्हे तर भाजपच्या आमदारांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेडच्या दौऱ्यावर असताना भाजपच्या आमदारांनी मंचावर उपस्थित असतानाच तक्रार केली होती.

    Eknath Shinde Orders Ministers: Monitor Ajit Pawar Funds

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य