• Download App
    Eknath Shinde Ladki Bahin Yojana Assurance Dahanu Election Campaign Photos Videos Rally लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेष;

    Eknath Shinde : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेष; एकनाथ शिंदेंचे आश्वासन

    Eknath Shinde,

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Eknath Shinde डहाणू नगर परिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. ही योजना म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. मी एकदा कमिटमेंट केली तर स्वतःचीही ऐकत नाही, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारच्या योजना आणि नेतृत्वावर जनतेचा विश्वास टिकून असल्याचा दावा केला. डहाणूतील प्रचारसभेत त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी जनतेला आवाहन केले. Eknath Shinde

    डहाणू नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रितपणे शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी भरत सिंह राजपूत यांना पाठिंबा दिला आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाने राजेंद्र माछी यांना उमेदवारी दिली असून, या दोन्ही उमेदवारांमध्ये थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संजय पाटील आणि हाफिजूर रहमान खान यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने या लढतीला आणखी स्पष्टता आली. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शिंदे गट एकीकडे, तर महाविकास आघाडी दुसरीकडे अशा सरळ-साध्या लढतीचे चित्र उभे राहिले आहे. Eknath Shinde



    यंदाच्या निवडणुकीत डहाणूतील अनेक प्रभागांमध्ये थेट एक–एक उमेदवारांमधील लढतीची स्थिती निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक 2, 3, 5, 7, 11 आणि 12 या प्रभागांमध्ये उमेदवारांची संख्या फक्त दोन इतकीच असल्याने मतदारांकडून कोणत्या बाजूला कल झुकतो यावरच निकाल अवलंबून असेल. इतर प्रभागांमध्येही तीन ते चारपेक्षा जास्त उमेदवार मैदानात नसल्याने संपूर्ण निवडणूक सरळ, स्पष्ट लढतीची बनली आहे. स्थानिक राजकारणात ही स्थिती विशेष मानली जात असून, यामुळे प्रभागनिहाय प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

    लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाची

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेत बोलताना महाविकास आघाडीवरही टीका केली. जनतेच्या हिताच्या योजना थांबवणे, अडथळे निर्माण करणे आणि विकासाला ब्रेक लावणे ही त्यांची पद्धत आहे. आम्ही केला तो विकास आणि त्यांनी केलेली राजकारणाची नकारात्मक शैली, यातला फरक डहाणूची जनता ओळखते, असे ते म्हणाले. त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा विशेष उल्लेख करत ही योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी अत्यंत महत्त्वाची असून ती दडपण्याचा प्रयत्नही काही राजकीय शक्ती करणार नाहीत, असा विश्वासही व्यक्त केला.

    Eknath Shinde Ladki Bahin Yojana Assurance Dahanu Election Campaign Photos Videos Rally

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sharad Pawar : मतदार यादीच्या घोळावर एकत्र येता, मग निवडणुकीत मनसे का नको? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेस नेत्यांना थेट सवाल

    भाजपशी मतभेद झाल्याच्या बातम्यांचा पूर; पण एकनाथ शिंदेंचा वेगवेगळ्या समाज घटकांशी संवाद

    अहंकार मोडण्यासाठी शिवसेना मैदानात; डहाणूच्या प्रचार सभेत एकनाथ शिंदेंचा एल्गार