विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेना भाजप यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे सावध पवित्रा घेत एकनाथ शिंदे यांनी छोट्या पक्षांशी देखील वाटाघाटी सुरू ठेवल्यात. कारण भाजपशी वाटाघाटी करताना काही अडचणी आल्या किंवा अगदीच महायुती तुटायची वेळ आली तर शिवसेना अडचणीत सापडायला नको म्हणून एकनाथ शिंदे यांनी सावधपणे छोट्या पक्षांची मोट बांधली आहे.
या पार्श्वभूमीवरच शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला संपूर्ण सहकार्य करण्यासोबतच, रिपब्लिकन सेनेला उचित प्रतिनिधित्व देण्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांची शिवसेना आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेला काही जागा सोडायला तयार असल्याचे स्पष्ट झाले.
- फडणवीस सरकारचा निर्णय; नगराध्यक्षांना नगरपरिषदां मध्ये सदस्यत्व आणि मताचाही अधिकार; नेमका अर्थ काय??
या बैठकीला आनंदराज आंबेडकर यांचे पुत्र ॲड. अमन आंबेडकर, खासदार मिलिंद देवरा, शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
भाजप जर वेगवेगळ्या घटकांना आपल्याशी जोडून घेत असेल, तर आपणही त्यात मागे नाही हे एकनाथ शिंदे यांनी या बैठकीच्या निमित्ताने दाखवून दिले.
Eknath Shinde and Anandraj Ambedkar held discussions regarding seat-sharing for the Mumbai Municipal Corporation elections.
महत्वाच्या बातम्या
- K Kavitha : के. कविता यांची घोषणा- नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार; 2029ची विधानसभा निवडणूकही लढवणार
- सहा तास चर्चा करून सुद्धा सुप्रिया सुळे अपयशी; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादीचा राजीनामा!!
- फडणवीस सरकारचा निर्णय; नगराध्यक्षांना नगरपरिषदां मध्ये सदस्यत्व आणि मताचाही अधिकार; नेमका अर्थ काय??
- Jammu Kashmir : श्रीनगर ते जम्मू पर्यंत सुरक्षा, 80 गावांमध्ये घरोघरी तपासणी; घुसखोरी थांबवण्यासाठी काश्मीर पोलीस-सेनेचे संयुक्त अभियान