• Download App
    नाशिकच्या सातपूर परिसरातून दारूची वाहतूक करणारा आयशर ट्रक ताब्यात , तब्बल २०० दारूचे बॉक्स जप्तEicher truck transporting liquor from Satpur area of ​​Nashik seized, 200 boxes of liquor seized

    नाशिकच्या सातपूर परिसरातून दारूची वाहतूक करणारा आयशर ट्रक ताब्यात , तब्बल २०० दारूचे बॉक्स जप्त

    या ट्रकचा चालक कामीम इमरानउद्दीन अहमद आणि वाहनमालक दिपक गणपत रोकडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.Eicher truck transporting liquor from Satpur area of ​​Nashik seized, 200 boxes of liquor seized


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : महाराष्ट्रात दारूची बंदी असली तरी बऱ्याच दिवसांपासून नाशिक शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होताना दिसत आहे.दरम्यान आज सातपूर परिसरातून दारूची वाहतूक करणारा आयशर ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागच्या वतीने ही करावाई करण्यात आली.

    या ट्रकमधून तब्बल 200 दारूचे बॉक्स ताब्यात घेण्यात आले आहेत. ट्रक आणि दारूसाठा मिळून जवळपास तीस लाखांचा माल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे.



    दरम्यान या ट्रकचा चालक कामीम इमरानउद्दीन अहमद आणि वाहनमालक दिपक गणपत रोकडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ट्रकला पकडण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून ट्रॅप लावण्यात आला होता.त्यामुळे ट्रकला पकडण्यात अखेर यश आले. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या दारूवर राज्यात बंदी असून, हा साठा कुठून आणला? दारूचा साठा नेमका कुठे नेण्यात येणार होता, याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

    Eicher truck transporting liquor from Satpur area of ​​Nashik seized, 200 boxes of liquor seized

     

    Related posts

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!