विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी फडणवीस सरकारने आता OBC समाजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा लागू करण्याचा आज ऐतिहासिक निर्णय घेतला.Educational concessions for Maratha students like OBC students; Important decision of Fadnavis government
शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार, ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर मराठा समाजासाठी तब्बल 8 विशेष योजना सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण योजना नेमक्या कोणत्या आहेत, त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
– ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला 8 सवलती
– शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती
दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना आता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाही लागू होईल.
– वाहन चालक व वाहक प्रशिक्षण
मराठा समाजातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना सुरू करण्यात येणार आहे.
– माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती
इयत्ता 9 वी ते 12 वीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली विशेष शिष्यवृत्ती योजना मराठा प्रवर्गासाठी विस्तारित करण्यात आली आहे.
– शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती
विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबींबाबतच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती (Reimbursement) थेट शासनाकडून करण्याची योजना यात समाविष्ट आहे.
– परराज्यातील शिक्षणासाठी सवलत
महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे, परंतु परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी (Professional Courses) प्रवेश घेतलेल्या मराठा उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येईल.
– व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मराठा विद्यार्थी पात्र
इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व घटकांचा अभ्यास आता मराठा समाजासाठी खुला करण्यात आला आहे. सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजातील विद्यार्थी पूर्णपणे पात्र धरले जातील.
– रिक्त जागांवर प्रवेश घेणाऱ्यांनाही लाभ
केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर, प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरावरील (Institutional Level) जागांवर प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांनाही इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्व शैक्षणिक सवलती लागू करण्यात येतील.
– नवीन आदेशाची वाट न पाहता सवलती लागू
भविष्यात इतर मागास प्रवर्गास (OBC) ज्या काही नवीन शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा लागू करण्यात येतील, त्या सर्व सवलती पुढील कोणत्याही नवीन आदेशाची वाट न पाहता मराठा समाजास आपोआप लागू होतील, अशी अत्यंत महत्त्वाची तरतूदही या निर्णयात करण्यात आली.
Educational concessions for Maratha students like OBC students; Important decision of Fadnavis government
महत्वाच्या बातम्या
- Shashi Tharoor : वंदे मातरम्’ पूर्ण गाणे प्रत्येक कार्यक्रमात वाजवणे गरजेचे आहे का?’; शशी थरूर यांच्या वक्तव्याने नवा वाद
- ममतांच्या TMC मध्ये फूट; 58 आमदारांचा वेगळा गट स्थापन; ममतांनी हाकलून दिलेले ऋतब्रत बॅनर्जी विधिमंडळ पक्षाचे नेतेपदी!!
- Vedanta Group : वेदांता समूहावर ईडीची धाड; परकीय चलन नियमभंग प्रकरणी मुंबई-दिल्लीतील कार्यालयांची झडती, उद्योगविश्वात खळबळ
- Fadnavis : बळीराजासाठी फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; २ लाखांपर्यंत कर्जमाफीला मंजुरी, ५६ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा