• Download App
    महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळाप्रकरणी रोहित पवारांना EDने चौकशीसाठी बजावले समन्स |ED summons Rohit Pawar for inquiry in Maharashtra Cooperative Bank scam

    महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळाप्रकरणी रोहित पवारांना EDने चौकशीसाठी बजावले समन्स

    रोहित पवारांना ईडीने २४ जानेवारीला चौकशीसाठी बोलावले आहे


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंग तपासाचा भाग म्हणून ईडीने २४ जानेवारीला चौकशीसाठी बोलावले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.ED summons Rohit Pawar for inquiry in Maharashtra Cooperative Bank scam



    केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने ५ जानेवारी रोजी बारामती, पुणे, औरंगाबाद आणि अन्य काही ठिकाणी रोहित पवार यांच्या मालकीची बारामती अॅग्रो आणि अन्य संबंधित संस्थांच्या जागेवर छापे टाकल्याची माहिती आहे.

    रोहित पवार हे महाराष्ट्र विधानसभेत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. ते बारामती अॅग्रोचे मालक आणि सीईओही आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट २०१९ मध्ये एफआयआर नोंदवल्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरण प्रसिद्धीस आले होते.

    ED summons Rohit Pawar for inquiry in Maharashtra Cooperative Bank scam

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Piyush Goyal : भारताची टॉफी निर्यात 12 वर्षांत 166% वाढली; आर्थिक वर्ष 2026 मध्ये ₹132 कोटींवर, मंत्री पीयूष गोयल यांनी डेटा जारी केला

    भारत – सायप्रस यांच्यात संरक्षण, गुंतवणूक, सायबर सुरक्षा आणि व्यापार विकास करार; राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या!!

    Manoj Jarange : समाजाशी दगाफटका करू नका, 23 मेपूर्वी चर्चेला या; प्रसाद लाडांच्या शब्दावर विश्वास ठेवून गावागावातील बैठका थांबवल्या- मनोज जरांगे