रोहित पवारांना ईडीने २४ जानेवारीला चौकशीसाठी बोलावले आहे
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंग तपासाचा भाग म्हणून ईडीने २४ जानेवारीला चौकशीसाठी बोलावले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.ED summons Rohit Pawar for inquiry in Maharashtra Cooperative Bank scam
केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने ५ जानेवारी रोजी बारामती, पुणे, औरंगाबाद आणि अन्य काही ठिकाणी रोहित पवार यांच्या मालकीची बारामती अॅग्रो आणि अन्य संबंधित संस्थांच्या जागेवर छापे टाकल्याची माहिती आहे.
रोहित पवार हे महाराष्ट्र विधानसभेत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. ते बारामती अॅग्रोचे मालक आणि सीईओही आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट २०१९ मध्ये एफआयआर नोंदवल्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरण प्रसिद्धीस आले होते.
ED summons Rohit Pawar for inquiry in Maharashtra Cooperative Bank scam
महत्वाच्या बातम्या
- दावोसमध्ये 3.53 लाख कोटींचे विक्रमी गुंतवणूक करार करून मुख्यमंत्री महाराष्ट्रात परत!!
- वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्याने २५ पेक्षा अधिक विद्यार्थी बुडाले!
- अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलेल्या रामभक्तांना अल्पसंख्याक मोर्चा मोफत चहा देणार!
- राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी!