• Download App
    ED effect; खासदार भावना गवळींना दिसली “आणीबाणी”; संजय राऊतांना दिसले “दिल्लीत त्यांचे येणारे दिवस”|ED effect; Bhavana Gavli accuesd emergency; sanjay raut dares, shiv sena days will come in dehli!!

    ED effect; खासदार भावना गवळींना दिसली “आणीबाणी”; संजय राऊतांना दिसले “दिल्लीत त्यांचे येणारे दिवस”

    प्रतिनिधी

    मुंबई – सक्तवसूली संचलनालयाच्या चौकशीचा वरवंटा फिरायला लागला की भल्याभल्यांना त्याचे इफेक्ट दिसायला लागतात. ते अनेकांच्या सहन होण्यापलिकडचे असतात. तसाच इफेक्ट परिहवहन मंत्री अनिल परब आणि शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावरच्या ईडीच्या कारवाईने झाला आहे.ED effect; Bhavana Gavli accuesd emergency; sanjay raut dares, shiv sena days will come in dehli!!

    ७२ कोटींच्या घोटाळ्यात वाशिममध्ये आपल्या ५ शिक्षण संस्थांच्या ९ ठिकाणांवर छापे पडल्यानंतर शिवसेना खासदार भावना गवळी यांना देशात आणीबाणी लादल्याचे दिसले आहे, तर अनिल परबांना ईडीची नोटीस आल्यानंतर शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊतांना दिल्लीतले त्यांचे येणारे दिवस दिसले आहेत…!!



    संजय राऊत म्हणाले, की सूडाची भावना आणि बिनबुडाचे राजकारण यातून ईडीचे प्रकरण सुरू आहे. सगळ्यांचे दिवस येतात. दिल्लीत आमचेही दिवस येतील, असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे. कर नाही त्याला डर कशाला? आम्ही काहीही असेल तरी चौकशीला सामोरे जाऊ, अशी मखलाशीही त्यांनी केली आहे.

    आम्हाला ईडीची नोटीस आली तरी आमच्या चेहऱ्यावरचे हास्य ढळणार नाही. शिवसेना हे ईडीचे लक्ष्य आहे. पण त्याचा तसूभरही परिणाम महाविकास आघाडी सरकारवर होणार नाही, त्यांचे मनोधैर्य खचणार नाही. उलट वाढेलच. अनिल परब कायदा क्षेत्रातले जाणकार अल्याने काय करायचे हे त्यांना माहिती आहे, असे संजय राऊत म्हणाले.

    ईडीची नोटीसच नाही… पण देशात आणीबाणी

    मला ईडीचे कोणतीही नोटीस आलेली नाही. शिक्षण संस्थांवर ईडीचे अधिकारी आले आहेत. ते चौकशी करीत आहेत. आणीबाणीसारखी वागणूक दिली जात आहेत, अशी प्रतिक्रिया भावना गवळी यांनी व्यक्त केली आहे. सर्वच शिवसेनेच्या मंत्री, नेत्यांना टार्गेट करताहेत. माझ्या संस्थेचा एफआयआर मी स्वत: नोंदवला होता.

    मला तो हिशोब मिळाला नाही म्हणून मी तक्रार दाखल केली. त्यातले एकच वाक्य पकडायचे आणि त्यातला एकच आकडा घ्यायचा आणि ट्विट करत मोठा राईचा पर्वत बनवायचा. असा काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी खेळ मांडला आहे.

    माझ्या संस्थेची जी चौकशी होत आहे. तिथे ग्रामीण भागातील मुलं शिक्षण घेत आहेत. मी पाचवेळा या भागातून खासदार झाली आहे. कदाचित काही लोकांना ते चांगले दिसलेले नाही, अशी खोचक प्रतिक्रिया भावना गवळी यांनी व्यक्त केली.

    ED effect; Bhavana Gavli accuesd emergency; sanjay raut dares, shiv sena days will come in dehli!!

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!