• Download App
    Tokyo Paralympics 2020 : अभूतपूर्व ऐतिहासिक कामगिरी; भारतीय खेळाडूचा पुन्हा सुवर्णवेध, सुमित अँटीलला भालाफेकीत जागतिक विक्रमासह सुवर्ण पदक|TokyoParalympics, Men's Javelin Throw: Sumit Antil wins gold (Sport Class F64) with World Record throw of 68.55m

    Tokyo Paralympics 2020 : अभूतपूर्व ऐतिहासिक कामगिरी; भारतीय खेळाडूचा पुन्हा सुवर्णवेध, सुमित अँटीलला भालाफेकीत जागतिक विक्रमासह सुवर्ण पदक

    वृत्तसंस्था

    टोकियो :  टोकिया पॅराऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूने दुसरे सुवर्ण पदक जिंकून मोठा पराक्रम गाजविला आहे. सुमित अँटील याने भालाफेकीत जागतिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकून भारताची मान जगात उंचवली आहे. (Sport Class F64) मध्ये त्याने तब्बल ६८.५५ मीटर अंतरावर भाला फेक करून सुवर्ण पदकावर भारताचे नाव कोरले आहे.TokyoParalympics, Men’s Javelin Throw: Sumit Antil wins gold (Sport Class F64) with World Record throw of 68.55m

    भारताला ऑलिपिंकमध्ये दुसरे सुवर्ण पदक मिळताच देशात आनंदाची लहर पसरली असून आजच्या जन्माष्टमीच्या आनंदाला त्यामुळे बहर आला आहे. आज सकाळपासून भारताची पदकांची लयलूट सुरूच आहे.



    राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमित अँटील याचे अभिनंदन केले असून त्याने देशाची मान जगात उंचावल्याबद्दल समस्त भारतीयांना अभिमान वाटतो, असे म्हटले आहे.तत्पूर्वी, टोकियो पँराऑलिम्पिकमध्ये भारतीय दिव्यांग खेळाडूंनी अतिशय चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट चालू ठेवली.

    अवनी लेखरा हिने आज सकाळीच एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक मिळवल्यानंतर भारताने आणखीन तीन पदकांची कमाई केली आहे. देवेंद्र झांझरिया याने भालाफेकीत रौप्यपदक मिळवले. त्याच प्रकारात सुंदर सिंग याने ब्रॉंझपदक पटकावले तर थाळीफेकीत योगेश कथूनिया याने रौप्य पदक पटकावले आहे.

    TokyoParalympics, Men’s Javelin Throw: Sumit Antil wins gold (Sport Class F64) with World Record throw of 68.55m

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सिंगापूर-हाँगकाँगनंतर आता अमेरिकेत MDH आणि एव्हरेस्टची मसाल्यांची तपासणी; यूएस फूड रेग्युलेटर करतेय पडताळणी

    पाकिस्तानने म्हटले- भारतीय नेत्यांनी निवडणुकीत आमचा वापर करू नये; राजकारणासाठी मुद्दा करत आहेत

    US पोलिसांनी कृष्णवर्णीयाचा गळा दाबला, रुग्णालयात मृत्यू; श्वास गुदमरल्याचे सांगत होता, पोलिसांनी पाय काढलाच नाही