• Download App
    मुंबईत ३ कोटी १८ लाख रूपयांचे मादक द्रव्य जप्त ; पकडण्यात आलेले तीन नायजेरियन नागरीक । Drugs worth Rs 3 crore 18 lakh seized in Mumbai; Three Nigerian nationals arrested

    मुंबईत ३ कोटी १८ लाख रूपयांचे मादक द्रव्य जप्त ; पकडण्यात आलेले तीन नायजेरियन नागरीक

    या नागरीकांनी नव वर्ष स्वागतासाठी विक्रीसाठी ही मादक द्रव्ये आणली होती.ही मादक द्रव्ये मानखुर्दच्या रेल्वे ट्रॅकवर नेऊन विकली जात होती. Drugs worth Rs 3 crore 18 lakh seized in Mumbai; Three Nigerian nationals arrested


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पोलिसांनी बांद्रा उपनगर आणि नवी मुंबई येथे छापे टाकले आहेत. दरम्यान या छाप्यात तीन नायजेरियन नागरीकांना अटक केली आहे.तसेच त्यांच्याकडून ३ कोटी १८ लाख रूपयांचे मादक द्रव्य जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई मुंबई पोलिसांच्या मादक द्रव्य विरोधी पथकाने केली आहे.पकडण्यात आलेले तीन नायजेरियन नागरीक हे मादक द्रव्यांच्या आंतरराष्ट्रीय टोळीतील सदस्य असावेत असा संशय आहे.



    या नागरीकांनी नव वर्ष स्वागतासाठी विक्रीसाठी ही मादक द्रव्ये आणली होती.ही मादक द्रव्ये मानखुर्दच्या रेल्वे ट्रॅकवर नेऊन विकली जात होती. ते त्यांच्या नियमीत विक्रीचे ठिकाण असल्याचेही या कारवाईत उघड झाले आहे. हे, तिन्ही आरोपी वाशीत राहात होते. कापडाच्या व्यापारासाठी आपण मुंबईत आलो आहोत असे सांगून ते या मादक द्रव्यांचा चोरटा व्यापार करीत असत.

    Drugs worth Rs 3 crore 18 lakh seized in Mumbai; Three Nigerian nationals arrested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nida Khan : अखेर निदा खान TCS मधून निलंबित; कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका, शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा

    Sahar Sheikh : आमची सर्व कागदपत्रे कायदेशीर; MIM नगसेविका सहर शेख म्हणाली- सगळे आरोप बिनबुडाचे

    CM Devendra Fadnavis : संभाव्य एल निनोला टक्कर देण्यास महाराष्ट्र सज्ज; उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा- CM देवेंद्र फडणवीस