• Download App
    पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्षपद नाराज काँग्रेसकडे ; शिर्डीचे राष्ट्रवादीकडे ; महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय। Disgruntled Congress holds chairmanship of Pandharpur Vitthal Temple Committee; Shirdi's NCP

    पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्षपद नाराज काँग्रेसकडे ; शिर्डीचे राष्ट्रवादीकडे ; महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय

    2019 मध्ये महाविकास आघाडी सत्तेत आली.राज्यातील सत्तांतरानंतर अस्तित्वातील मंदिर समितीची पुनर्रचना होईल या हेतूने तीनही पक्षातील अनेक नेत्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये स्थान मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले होते. Disgruntled Congress holds chairmanship of Pandharpur Vitthal Temple Committee; Shirdi’s NCP


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिर्डी देवस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे दिले जाणार आहे.राज्यातील महामंडळाचे वाटप येत्या पंधरा दिवसात पूर्ण केले जाणार असल्याचे महाविकास आघाडीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. तिन्ही पक्षांनी या निर्णयावर एकमत दर्शवले आहे. इतर महामंडळाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेणार आहेत . विधानसभेचे रिक्त सभापतीपदही काँग्रेसलाच मिळणार असल्याची चर्चा आहे .

    राज्यातील विविध 50 महामंडळाच्या रखडलेल्या नियुक्त्या आणि शिर्डी आणि पंढरपुर मंदिर समितीची प्रतीक्षेत असलेली पुनर्रचना यामुळे तीनही पक्षातील अनेक इच्छुक याकडे डोळे लावून बसले होते.



    सध्या अस्तित्वात असलेली मंदिर समिती ही महायुती सरकारच्या काळात अस्तीत्वात आलेली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अतुल भोसले यांनी मंदिर समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता . महाविकास आघाडी सरकारच्या समन्वयकाच्या बैठकीत शिर्डीचे अध्यक्ष पद राष्ट्रवादीला तर पंढरपुर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद हे काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

    महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत महामंडळ नियुक्त्या आणि साई संस्थान, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी संस्थान विश्वस्तपदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आशुतोष काळे हे शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष असणार आहेत.

    Disgruntled Congress holds chairmanship of Pandharpur Vitthal Temple Committee; Shirdi’s NCP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस