• Download App
    Dhananjay Munde Slams Manoj Jarange Patil at Beed Maha-Elgar Rally: Alleges 'One Person Sowed So Much Poison That Brother Fights Brother' एका व्यक्तीने जाती-जातीत भांडणे लावली:माणसात माणूस राहिला नाही,

    Dhananjay Munde : एका व्यक्तीने जाती-जातीत भांडणे लावली:माणसात माणूस राहिला नाही, महाएल्गार सभेतून धनंजय मुंडेंची मनोज जरांगेंवर टीका

    Dhananjay Munde

    विशेष प्रतिनिधी

    बीड : Dhananjay Munde ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज, 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये राज्याच्या समस्त ओबीसी समाजाची एक मोठी महाएल्गार सभा पार पडली. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील जोरदार भाषण केले.Dhananjay Munde

    धनंजय मुंडे म्हणाले, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण त्यांना वेगळे आरक्षण द्या. आमच्या हक्काचे आरक्षण देणार असाल तर त्याला आम्ही विरोध करणार. यापुढे ओबीसी आरक्षणाला लढा हा देशाचे नेते छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली लढण्यात येणार. येणाऱ्या नगरपंचायत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ओबीसींची ताकद दाखवून द्या, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.Dhananjay Munde

    पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, एका व्यक्तीने जाती-जातीत एवढी भांडण लावली, माणसात माणूस ठेवला नाही. लोकसभेच्या आधी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये सख्खे दोन भाऊ एकमेकांविरोधात लढले. एक निवडून आला, दुसरा निवडून आला. त्यांच्यामध्ये एकमेकांविरोधात आई-बहिणीवरुन शिव्या सुरू झाल्या. इतके विष पेरले गेले, असे म्हणत मुंडे यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला.Dhananjay Munde



    कशाला त्या बिनडोक माणसाच्या नादाला लागताय?

    आम्ही काही बोललो तर तो लगेच बोलणार. पण यामध्ये मराठा समाजाचा काहीही फायदा नाही. ओबीसींमध्ये आल्यानंतर मराठा समाजाचे नुकसानच होत आहे, ईडब्लूएसचे आरक्षण गेले. त्यामुळे एमपीएससी परीक्षेमध्ये त्यांना तोटा झाल्याचे नुकताच लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. मराठा समाजातील गरिबातील गरीबाचा फायदा करायचा असेल तर त्यांना ईडब्लूएस शिवाय पर्याय नाही. कशाला त्या बिनडोक माणसाच्या नादाला लागताय? आपणच लई वाचाळ आहे असे त्याने समजायचे कारण नाही. आम्हालाही आमच्या भाषेत बोलता येते. दसऱ्याचा मेळावा संपल्यावर त्याने 1994 चा जीआर काढा असे म्हंटले. वंजारी समाजाचे दोन टक्के आरक्षण काढा असे त्याने म्हटले. पण काढायचे राहू द्या, न्यायाने द्यायचे शिका, असा टोला जरांगेंना धनंजय मुंडे यांनी लगावला.

    कुणी अंगावर आले तर त्याला शिंगावर घ्यायचे

    पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, आजही मराठ्यांनी त्यांचे वेगळे आरक्षण घ्यावे, ईडब्लूएसमधून घ्यावे. आमचा त्यांना विरोध नाही. पण आमच्या ताटातील काही घेत असाल तर आम्ही त्याला विरोध करणार. आपली ताकद ही भुजबळ साहेब आहेत. ते देशाचे नेते आहेत, आपल्या ओबीसी समाजाचे आरक्षण त्यांच्या नेतृत्वाखाली आपण टिकवून ठेऊ. आपले ओबीसी आरक्षण आपल्याला टिकवायचे आहे. यापुढे कुणाला घाबरायचे नाही. कुणी अंगावर आले तर त्याला शिंगावर घ्यायचे. आपसातले वाद बाजूला ठेवा. आता येणाऱ्या नगरपंचायत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये एकमेकांच्या विरोधात राहू नका, एकीने राहा. त्यामध्ये आपली ताकद दाखवून द्या.

    Dhananjay Munde Slams Manoj Jarange Patil at Beed Maha-Elgar Rally: Alleges ‘One Person Sowed So Much Poison That Brother Fights Brother’

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    वसुबारसेचे अनोखे सवत्सधेनु पूजन; गोवंश संरक्षणाचा वाकळवाडी ग्रामपंचायतीचा ठराव!!

    पवार + काँग्रेस साजरी करायला सांगताहेत काळी दिवाळी; ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्कवर केली फटक्यांची आतषबाजी; याला म्हणतात, महाविकास आघाडी!!

    सृष्टीच्या पोषणाचा विचार योगशास्त्रात; विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांच्या विरोधात नाही!!