• Download App
    मुंबई महापालिकेचे ९ प्रभाग वाढविण्याचा निर्णय; पण कोणाच्या राजकीय पथ्यावर??|Decision to increase 9 wards of Mumbai Municipal Corporation; But on whose political path

    मुंबई महापालिकेचे ९ प्रभाग वाढविण्याचा निर्णय; पण कोणाच्या राजकीय पथ्यावर??

    प्रतिनिधी

    मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने मुंबई महापालिकेतील प्रभाग रचनेत वाढ करून प्रभागांची संख्या ९ ने वाढवून ती २२७ वरून २३६ अशी केली आहे. मुंबई महापालिकेत आता २२७ ऐवजी २३६ नगरसेवक असतील.Decision to increase 9 wards of Mumbai Municipal Corporation; But on whose political path

    राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला असला तरी हा नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार आहे?, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेची निवडणुकीची ही तयारी आहे की अधिक नगरसेवक वाढवले असते तर आपल्याला अडचणीचे ठरले असते म्हणून फक्त नऊच नगरसेवक वाढवून शिवसेनेच्या नेतृत्वाखालचे सरकार मोकळे झाले आहे, अशा स्वरूपाचे आरोपही भाजपकडून होत आहेत.



    त्याच वेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष याच मुद्द्यावरून अस्वस्थ आहेत. शिवसेनेने खालोखाल महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष मुंबईत बळकट आहे. परंतु नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर त्यांची संघटनात्मक बळकटी कितपत उपयोगी पडेल?, याविषयी शंका आहे.

    आघाडीतला तिसरा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांची मुंबईतील शक्ती तोळामासा आहे. त्यातच सचिन आहिर सारखा राष्ट्रवादीतला मोठा मासा शिवसेनेने आधीच गळाला लावला असल्यामुळे राष्ट्रवादीला आहे त्याच जागा लढवणे मुश्कील आहे. त्यात नगरसेवक वाढल्याने ते आणखी राजकीय चंद्रबळ कुठून आणणार?, हा खरा प्रश्न आहे.

    त्यामुळे नगरसेवकांची संख्या मामुली वाढवून एक प्रकारे महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष बचावात्मक राजकारण करू इच्छितात का? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

    राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने २०२१ च्या जनगणनेचे निष्कर्ष अद्याप जाहीर झालेले नाहीत. नगरसेवकांची संख्या वाढवताना राजकीय फायदा आणि त्याची गणितही डोळ्यासमोर ठेवले जाते. त्यामुळे मुंबईतील नगरसेवक संख्या वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला असल्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    शिवसेना निवडणूकीला घाबरली : भाजप

    मुंबईत नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ करण्यात आली आहे. फक्त नऊच सदस्य का वाढले ? याला लोकसंख्येचा काय आधार आहे ? जनगणनेचा आधार काय ? असा सवाल भाजपाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाठ यांनी केला आहे. केवळ राजकीय सोयीसाठी तोंडावर आलेली निवडणूक पुढे ढकलण्यासाठी नगरसेवकांची संख्या बदलण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील शिवसेनेने घेतला आहे.

    मंत्रिमंडळात मुंबई महानगरपालिकेत ९ प्रभाग वाढवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय यापूर्वीही झाला असता सर्व महापालिकांमध्ये १५ टक्के जागा वाढवल्या त्यावेळी मुंबई महापालिकेत जागा वाढल्या नाहीत. हे त्यांच्या लक्षात आले आहे. प्रभाग रचनेत गडबड करून आपण ही निवडणूक जिंकू का?

    तर तो डाव यशस्वी होणार नाही हे लक्षात आल्यावर आता, प्रभागांची संख्याच नऊने वाढवावी, म्हणजे प्रभागाची पूर्ण फेररचना करायला आपल्याला रान मोकळे मिळेल. या राजकीय हेतूने नऊची संख्या वाढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलेला आहे. हे निवडणूकीला घाबरलेले आहेत, असा आरोप शिरसाठांनी केला आहे.

    Decision to increase 9 wards of Mumbai Municipal Corporation; But on whose political path

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस