• Download App
    शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी! सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट Death threat to Sharad Pawar NCP delegation including Supriya Sule met Mumbai Police Commissioner

    शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी! सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

    एका सोशल मीडिया अकाऊंटवरून शरद पवारांना ही धमकी देण्यात आली  आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार आणि पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांना भेटायला गेले. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ करणार आहे. Death threat to Sharad Pawar NCP delegation including Supriya Sule met Mumbai Police Commissioner

    शरद पवार यांना मिळालेल्या धमकीची माहिती देताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पवारांसाठी मला व्हॉट्सअॅपवर मेसेज आला होता. एका वेबसाईटच्या माध्यमातून त्यांना धमकी देण्यात आली होती. पोलिसांकडे न्याय मागण्यासाठी आलो आहोत. महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी माझी मागणी आहे. अशी कृत्ये हे घाणेरडे राजकारण असून ते थांबले पाहिजे.

    सुळे म्हणाल्या की, ‘’महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत आहे. मी आदरणीय अमित शहा यांना विनंती करते की कृपया महाराष्ट्राकडे लक्ष द्या, इथे काय चालले आहे.’’

    शरद पवारांना “तुमचाही दाभोलकर होणार”, अशी धमकी देण्यात आली असून, या धमकीबरोबरच शरद पवारांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

    Death threat to Sharad Pawar NCP delegation including Supriya Sule met Mumbai Police Commissioner

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!