वृत्तसंस्था
मुंबई : ड्रग्ज प्रकरणावरून सत्ताधारी मंत्री रोज पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज माफियांना वाचवण्यासाठी टाहो फोडतात. मात्र, ४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून देखील सरकार या विषयावर बोलायला तयार नाही. त्यामुळे एसटी जोपर्यंत मला मुंबईत जाऊ देणार नाही, तोपर्यंत इथेच अन्नत्याग आंदोलन करणार आहे,” असे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. Daily press conference of ministers on drug issue; Also talk about the suicide of ST employees: Khot; Sadabhau khot and st employees were stopped from entering to mumbai
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. परिणामी एसटी वाहतुक ठप्प झाली असून, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे.
सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांसह मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र, मोर्चेकऱ्यांमुळे वाहतूक कोंडी झाल्याने त्यांना वाशी चेकनाक्याजवळ थांबवण्यात आलं आहे. “हे आंदोलन चिघळवण्याचं काम राज्य सरकारनं केल आहे. शांततेच्या मार्गाने आझाद मैदानावर एसटी कर्मचारी येतील, मंत्रालयालयाऐवजी आझाद मैदानात येण्याचं आवाहन प्रशासनाने केलं होतं. त्यांच्या आवाहनाला आम्ही संमती दिली होती. पंरतु त्यापूर्वीच आम्हाला अडवण्यात आले. राज्यभरातून जवळपास ५० हजार एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, सर्वांनाच कुठेना कुठे पोलीस बॅरिकेड्स लावून अडवत आहेत. ही लढाई एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काची लढाई आहे. आपण त्यांना त्यांचा हक्क मागण्यापासून थांबवू शकत नाही,” असं सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
पोलिसी बळाने आंदोलन मोडण्याचे षडयंत्र
“दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक झाली. या बैठकीत पोलिसांच्या बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढायचं ठरल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.
Daily press conference of ministers on drug issue; Also talk about the suicide of ST employees: Khot; Sadabhau khot and st employees were stopped from entering to mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल