वृत्तसंस्था
पुणे : कोरोनाच्या काळात माणुसकीचं दर्शन घडत असताना कोविड सेंटरमधील डॉक्टर आणि नर्सना पुण्यातील एका सोसायटीने राहण्यास मनाई केली तसेच त्यांना घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Corona warriors are forbidden to stay in society
कात्रज कोंढवा रोडवरील एका सोसायटीत ही घटना घडली आहे. गोकुळनगर येथे 25 ऑक्सिजन बेड आणि एकूण 70 बेड्स असलेल्या कोविड केअर सेंटर आहे. तेथे 35 जणांचा स्टाफ आहे, मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे मदतीसाठी कोल्हापूरहून एक डॉक्टर आणि चार नर्सेस यांची तुकडी गुरुवारी या केंद्रात दाखल झाली. त्यांची राहण्याची सोय केली होती. पण 16 तास काम केल्यानंतर रात्री शांत झोप मिळावी, यासाठी त्यांनी सोसायटीत फ्लॅट भाड्यानं घेतला.
बुधवारी ते रहायला आले. मात्र दुसऱ्याच दिवशी घरमालक यांनी, सोसायटी विरोध करत असल्यानं तुम्ही राहू नका, असे सांगितलं. कोविड सेंटरमध्ये तुम्ही काम करत आहात. सोसायटीत संसर्ग होईल, लहान मुलांना धोका उद्भवेल, असे सांगून सोसायटीतील सदस्यांनी घरमालकावर दबाव आणून त्यांना फ्लॅटमध्ये येण्यास मनाई करण्यास भाग पाडलं. अतिशय उद्विग्न झालेल्या या सर्वांनी पुन्हा सेंटरचा आसरा घेतला. दरम्यान, पोलिसांनी हे प्रकरण समजुतींनी सोडवण्याचा सल्ला दिला. सोसायटीने ऐकलं नाही तर ते कारवाई करणार आहेत.
Corona warriors are forbidden to stay in society