• Download App
    पुण्यात पुन्हा कोरोना लसींचा तुटवडा ; साठा नसल्याने लसीकरण केंद्राना टाळे।Corona vaccine shortage in Pune again.

    पुण्यात पुन्हा कोरोना लसींचा तुटवडा ; साठा नसल्याने लसीकरण केंद्राना टाळे

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यामध्ये कोरोनाविरोधी लसींचा तुटवडा निर्माण झाला असून दीड ते दोन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली आहे. Corona vaccine shortage in Pune again.



    शहरात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे लसीकरण वाढवण्याची मागणी केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र पुरेशा लसी उपलब्ध होतच नाहीत. त्यामुळे नागरिक चिंतेत पडले आहेत.
    शहरातले लसीकरण पाहता या लसी दीड दिवस पुरतील. मात्र नव्या साठ्याबाबत काहीही माहिती नाही. त्यामुळे अनेक केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली.

    नवी केंद्र सुरु करायची कशी ?
    शहरात १६० लसीकरण केंद्र सुरु आहेत. नवी केंद्र सुरु करण्यास खासगी रुग्णालय तयार आहेत. महापालिकेच्या नव्या जागा तयार आहेत. पण लस नसेल तर केंद्र सुरु करायची कशी ?असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

    Corona vaccine shortage in Pune again.

    Related posts

    BJP Navnath Ban : केदारनाथ नको, औरंगजेबाच्या कबरीवर जा!:संजय राऊतांवर भाजपची सडकून टीका

    Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची पत्रकार परिषद; इंडिया आघाडी आणि उद्धव ठाकरेंवरही टीका

    Abdul Sattar : जिल्हा बँक निवडणुकीत अब्दुल सत्तारांना मोठा धक्का! मुलगा समीरचा अर्ज बाद; “देवेंद्रजी योग्य न्याय करतील”, सत्तारांचा विश्वास