• Download App
    कोरोना निर्बंधांचा पंचतारांकित हॉटेलांना फटका, पुण्यातील दोन पंचतारांकित हॉटेल चक्क विकायला|Corona restrictions hit five-star hotels, two five-star hotels in Pune for sale

    कोरोना निर्बंधांचा पंचतारांकित हॉटेलांना फटका, पुण्यातील दोन पंचतारांकित हॉटेल चक्क विकायला

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : ठाकरे सरकारने कोरोनाच्या नावाखाली घातलेल्या निर्बंधांचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. पंचतारांकित हॉटेलला झालेला आर्थिक तोटा जास्त आहे. त्यामुळे चालविण्यासाठी पैसेच नसल्याने पुण्यातील दोन पंचतारांकित हॉटेल चक्क विकायला काढली आहेत. यामध्ये बंडगार्डन रस्त्यावरील आणि हिंजवडीतील एका हॉटेलाचा समावेश आहे. हिंजवडीतील हॉटेलची किंमत २०० कोटी रुपये आहे.Corona restrictions hit five-star hotels, two five-star hotels in Pune for sale

    कोरोनामुळे महाराष्ट्रातील निर्बंध हटवायला ठाकरे सरकार तयार नव्हते. दोनच दिवसांपूर्वी हॉटेल दहा वाजेपर्यंत चालू ठेवायला परवानगी देण्यात आली होती. त्यापूर्वी केवळ चार वाजेपर्यंत परवानगी होती. त्यामुळे हॉटेल व्यवसायाचे आर्थिक गणति पूर्णपणे बिघडून गेले आहे. हॉटेल व्यावसायिकांकडे चालविण्यासाठी पैसेच राहिले नाहीत. त्यातच तिसºया लाटेच्या भीतीमुळे भविष्यही दोलायमान आहे. त्यामुळे अनेक हॉटेल एक तर विकायला आहेत किंवा त्यांचे व्यवस्थापन दुसऱ्याकडे सोपविले जाण्याची शक्यता आहे.



    पुणे हॉटेल असोसिएशनच्या एका सदस्याने हॉटेल विक्रीला निघाल्याची माहिती खरी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, या दोन हॉटेलांशिवाय महात्मा गांधी रस्त्यावरील एक फोर स्टार हॉटेल तसेच शहरातील आणखी तीन हॉटेल दुसऱ्या व्यवस्थापनाच्या शोधात आहेत.

    ते म्हणाले, हिंजवडीतील हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बसला आहे. येथील फाईव्ह स्टार हॉटेल दोनशे कोटी रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. येथील अनेक हॉटेल बंद झाली आहेत. काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

    हॉटेल व्यवसायातील तज्ज्ञ सांगतात की पुणे, लोणावळा, मुंबई आणि गोव्यातील अनेक हॉटेल विकायला काढली आहेत. त्याच्या जाहिराती सोशल मीडियावर केल्या जात आहेत. यातील बहुतांश हॉटेल्स ही गेल्या चार ते पाच वर्षांतील आहेत. मात्र, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांत त्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोझाही वाढला आहे. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका पूर्णपणे संपलेला नसल्याने विकत घेण्यासाठी खरेदीदार पुढे येत नाहीत.

    Corona restrictions hit five-star hotels, two five-star hotels in Pune for sale

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Shinde : मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला शिवसेनेचा महापौर व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना – एकनाथ शिंदे

    Navneet Rana : नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी- बाबा सिद्दिकीसारखीच तुमची हत्या करू, पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

    Devendra Fadnavis : विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र भारताचे ‘गेटवे ऑफ इंडिया’; राज्याच्या सर्व भागासाठी वैविध्यपूर्ण क्षेत्रांत गुंतवणूक येणार- CM देवेंद्र फडणवीस