• Download App
    अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाल्यावर न्यूयॉर्कच्या गव्हर्नरचा राजीनामा New York Governer resigned due to sex scandle

    अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाल्यावर न्यूयॉर्कच्या गव्हर्नरचा राजीनामा

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क – अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे चौकशीनंतर उघड झाल्यावर न्यूयॉक राज्याचे गव्हर्नर अँड्‌य्रू कुओमो यांना राजीनामा द्यावा लागला आहे. कुओमो यांनी राजीनामा दिला असला तरी आरोप अमान्य केले आहेत.

    त्यांच्यानंतर कॅथी हॉकुल यांच्याकडे गव्हर्नरपदाची जबाबदारी येणार असून त्या न्यूयॉर्कच्या पहिल्या महिला गव्हर्नर ठरणार आहेत. गैरप्रकाराचा आरोप झाल्यावरून पद सोडावे लागलेले कुमोओ हे न्यूयॉर्कचे सलग तिसरे गव्हर्नर ठरले आहेत.

    कुमोओ यांच्यानंतर गव्हर्नरपदाची जबाबदारी एका महिलेवर येणे ही महत्वाची बाब मानली जाते. अमेरिकेच्या संसदीय राजकारणात गव्हर्नरपदाला विशेष महत्व आहे. अमेरिकेच बहुतांश अध्यक्ष हे त्या पदावर निवडून येण्याआधी कोणत्या ना कोणत्या प्रांताचे गव्हर्नर झालेलेच असतात.

    त्यातही जेथे संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय आहे तसेच जे शहर अमेरिकेतील फार महत्वाचे शहर मानले जाते अशा शहराच्या गव्हर्नर या पद्धतीन नामुष्कीने पदावरून जावे लागणे हा अमेरिकेच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    US China : अमेरिकेचा चीनवर आणखी दबाव; अलीबाबा, बायडूसह अनेक दिग्गज कंपन्या ‘लष्कराशी संबंधित’ यादीत

    Trump : ट्रम्प यांचा पुन्हा दावा; ‘2-3 दिवसांत इराणसोबत करार होईल’, पण तेहरानचा पलटवार – ‘ट्रम्पनाच करार नको’

    Iran : इराणमध्ये आता भाकरीही हप्त्यांवर! अमेरिका-इराण संघर्ष, महागाई आणि निर्बंधांनी जनतेचे कंबरडे मोडले