• Download App
    कोरोना पॉझिटिव्हिटी दर एक टक्क्यांवर आल्याने मुंबईकरांना मिळाला दिलासा|Corona positivity rate decresed in mumbai

    कोरोना पॉझिटिव्हिटी दर एक टक्क्यांवर आल्याने मुंबईकरांना मिळाला दिलासा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पॉझिटिव्हिटी दर १ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत कोरोना आता आटोक्यात येत असून २३ वॉर्डमधील रुग्ण दुपटीचा कालावधी एक हजार दिवसांच्या पुढे गेला आहे.Corona positivity rate decresed in mumbai

    एकीकडे मुंबईत दिलासादायक परिस्थिती असली तरी मृत्युदर मात्र ३ टक्क्यांच्या वर आहे. जागतिक मृत्युदर २.१४ टक्के आहे. देशाचा मृत्युदर १.३४ टक्के; तर राज्याचा मृत्युदर २.११ टक्क्यांवर आहे.



    मुंबईचा रुग्णदुपटीचा दर १४५८ दिवस झाला आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्णदुपटीचा कालावधी ‘बी’ प्रभाग म्हणजेच सँडहर्स्ट रोडमध्ये ३,८०९ दिवस; तर सर्वांत कमी रुग्णदुपटीचा कालावधी ‘डी’ प्रभाग कुलाबा-फोर्ट ९८२ दिवस आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात असताना मुंबईतील कोरोना स्थिती सुधारल्याने दिलासा मिळाला आहे.

    रविवारी दिवसभरात १० मृत्यूंची नोंद झाली. बाधित रुग्णांसह मुंबईतील मृतांचा आकडाही गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी झाला असला, तरी सध्याचा मृत्युदर संपूर्ण जगातील मृत्युदराच्या तुलनेत अधिक आहे.

    Corona positivity rate decresed in mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा