विशेष प्रतिनिधी
मुंबई – मुंबईमध्ये कोविड रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून काल तब्बल ५३० बाधित आढळले आहेत. साधारणत: दोन महिन्यांनंतर रुग्णसंख्या ५००च्या वर गेली आहे. Corona increasing rapidly in Mumbai
त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यात दिलादायक बाब म्हणजे मृत्यू अजूनही नियंत्रणात असून मुंबईत काल चार कोविड रुग्णांचा मृत्यू झाला.
गेल्या आठवड्यापर्यंत २५० पर्यंत खाली गेलेला रुग्णांचा आकडा मुंबईत हळूहळू वाढत आहे.
यापूर्वी ११ जुलै रोजी ५५५ बाधित रुग्ण सापडले होते; तर १२ जुलैला ४७८ रुग्ण सापडल्याने ५०० च्या आत रुग्ण आले होते. त्यानंतर आता दोन महिन्यांनंतर दैनंदिन रुग्णसंख्या ५०० च्या वर पोहोचली आहे. सध्या ३,८९५ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईतील रुग्णांची एकूण संख्या ७,४७,६०८ वर पोहोचली आहे; तर मृतांचा आकडा १६,००४ वर गेला आहे.
आज मृत्यू झालेल्या चौघांपैकी तिघांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये चार पुरुषांचा समावेश होता. त्यातील दोघांचे वय ४० ते ६० दरम्यान होते. उर्वरित दोघे ६० हून अधिक वर्षांचे होते. तसेच मुंबईत आज ४८,५२१ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून पॉझिटिव्हीटी दर १.०९ टक्के इतका आहे.
Corona increasing rapidly in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- इन्फोसिससारख्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे, पांचजन्यमधील लेखावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली नाराजी
- भुकबळीच्या दिशेने जात असलेल्या अफगणिस्थानला अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघाकडून मानवतेच्या भावनेतून मदत, अमेरिका देणार ४७१ कोटी
- देशात आठवड्यात एक विश्वविद्यालय सुरु, गेल्या सात वर्षातील चित्र; केंद्र सरकारचे शिक्षणाला प्रोत्साहन दिल्याचा परिणाम
- कोरोना प्रतिबंधक लसीकरणात भारताचा नवा उच्चांक! ७५ कोटींपर्यंत मारली मजल; WHO कडून अभिनंदन