प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती संभाजी नगर मध्ये महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा झाली. त्याच्या तयारी पासून प्रत्यक्ष कार्यवाही पर्यंत शिवसेनेचेच 80 % प्रतिनिधित्व दिसले. महाविकास आघाडीतले दुसरे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे नेते प्रातिनिधिक स्वरूपात त्या सभेला उपस्थित होते. मुख्य भाषण अर्थातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे झाले, पण भाषणापेक्षा त्यांच्या मध्यवर्ती खुर्चीची चर्चा जास्त झाली.Congress to hold torch march on 11 April in support of rahul Gandhi, how many Thackeray faction leaders and NCP leaders will attend it??
संभाजीनगरची सभा यशस्वी झाल्याचे समजून महाविकास आघाडीत नागपूरला 16 एप्रिलला होणाऱ्या वज्रमूठ सभेची तयारी सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन त्यांच्यावर शरसंधान साधणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले आहे.
काँग्रेसची वेगळी तयारी
पण या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मात्र वेगळीच तयारी सुरू आहे नागपुरात 16 एप्रिलला महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत सामील होण्यापूर्वी काँग्रेस मुंबईत 11 एप्रिलला महात्मा फुले जयंतीच्या दिवशी राहुल गांधींच्या समर्थनार्थ मशाल मोर्चा काढणार आहे. या मशाल मोर्चासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असला तरी तो महाविकास आघाडीचा मोर्चा आहे, असे लेबल काँग्रेस नेत्यांनी त्याला लावले आहे. त्यामुळे या मोर्चात महाविकास आघाडीचे इतर दोन घटक पक्ष शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे किती नेते आणि कार्यकर्ते सामील होतील?, याची लिटमस टेस्ट काँग्रेसला घेता येणार आहे.
राष्ट्रवादीच्या बैठकीत नानाविरोधी सूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालच झालेल्या पक्षाच्या आमदार खासदारांच्या बैठकीत ठाकरे गटाबरोबर जागा वाटपाची चर्चा सुरू करण्याची सूचना शरद पवार यांनी केल्याचे समजते. त्याचवेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे समन्वयात अडचणी आणत असल्याची चर्चा या बैठकीत झाल्याचेही समजते. अशोक चव्हाण हे चांगल्या समन्वय राखतात. पण नानांमुळे काही अडचणी उत्पन्न होतात, असा सूर त्या बैठकीत लावला गेला होता.
स्वतः नाना पटोले हे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत छत्रपती संभाजीनगर मध्ये उपस्थित नव्हतेच. ते आजारी असल्याचे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. पण संभाजीनगरच्या सभेच्या वेळी आजारी असलेले नाना दुसऱ्या दिवशी ताबडतोब बरे झाले आणि राहुल गांधींच्या सुरत कोर्टाच्या पेशीच्या वेळी ते सुरतला हजर झाले. पण नानांनी नेमके असे कोणते औषध घेतले की जे 12 तासांत बरे झाले आणि थेट सुरतला पोहोचले? याचे “राजकीय औषध” मात्र महाविकास आघाडीतल्या नेत्यांना अद्याप सापडलेले नाही.
ठाकरे गट – राष्ट्रवादीसाठी लिटमस टेस्ट
पण या पार्श्वभूमीवर नागपूरची वज्रमूठ सभा 16 एप्रिलला होत असताना त्यापूर्वी मुंबईत राहुल गांधींच्या समर्थनार्थ मशाल मोर्चा काढण्याचे निश्चित करून काँग्रेसने त्या मशाल मोर्चाला महाविकास आघाडीचा मशाल मोर्चा असे स्वरूप देऊन बाकीच्या दोन घटक पक्षांची परीक्षा पाहण्याचे निमित्त मिळवले आहे. आता या मशाल मोर्चा शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे किती नेते सामील होतात आणि त्या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो?, यावर महाविकास आघाडीत काँग्रेस कितपत रस घेईल आणि आपले स्थान मजबूत अथवा कमकुवत करून घेईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!
Congress to hold torch march on 11 April in support of rahul Gandhi, how many Thackeray faction leaders and NCP leaders will attend it??
महत्वाच्या बातम्या
- आंतरधर्मीय विवाहावरून नंदुरबारमध्ये मध्यरात्री हिंसक संघर्ष; दगड-विटांचा मारा, पोलिस जखमी
- कर्नाटकच्या मंत्र्याला अल्पसंख्याकांविरोधात द्वेषपूर्ण भाषण करणे महागात, निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई
- PM मोदींनी मी चूक असल्याचे सिद्ध केले, भाजप सरकार पुरस्कार देईल असे वाटलेही नव्हते, पद्मश्री मिळाल्यानंतर शाह रशीद अहमद कादरी भावुक
- सुप्रीम कोर्ट : ईडी – सीबीआय तपासात पुढाऱ्यांना जन सामान्यांचाच न्याय; विरोधकांच्या “ऑक्सिजन” नळीवर पाय!!