नाशिक : शरद पवारांचा “डाव” काँग्रेसने ओळखला, म्हणूनच घातला त्यांच्या नावाला खोडा!!, अशी राजकीय घडामोड आज घडली. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या मार्फत शरद पवारांनी स्वतःच्याच नावाचा “वजीर” पुढे सरकवला. आपण शरद पवारांची थेट चर्चा केली आहे. शरद पवारांची महाविकास आघाडीतूनच राज्यसभेत जायची इच्छा आहे, असे संजय राऊत जाहीरपणे म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांचे म्हणणे खोडून काढले नाही. शरद पवार राज्यसभेत जाणार की नाही याचा निर्णय आठवडाभरात होईल, एवढेच संधिग्ध विधान त्यांनी केले.
पण या मधला शरद पवारांचा “डाव” मात्र काँग्रेसने व्यवस्थित ओळखला. एकीकडे शरद पवार महाविकास आघाडीतल्या आमदारांच्या मतांच्या बळावर राज्यसभेत पोहोचणार आणि दुसरीकडे पार्थ पवार महायुतीच्या आमदारांच्या मतांच्या बळावर राज्यसभेत जाणार याचा अर्थ पवार कुटुंबालाच फक्त राजकीय फायदा होणार, हे काँग्रेसच्या नेत्यांनी व्यवस्थित लक्षात घेतले. काँग्रेसचे वाढते बळ लक्षात घेऊनच पवारांनी संजय राऊत यांच्यामार्फत ही खेळी केल्याचे काँग्रेसच्या नेत्यांच्या लक्षात आले.
– पवारांना काँग्रेसने संधी द्यायची गरज नाही
एकीकडे भाजपला डोळा मारत राहायचे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करून भाजपच्या सत्तेचा लाभार्थी व्हायचे आणि दुसरीकडे फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा तोंडी गजर करून महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतांच्या बळावर स्वतःचा राज्यसभेचा मार्ग मोकळा करून घ्यायचा हा शरद पवारांनी “डाव” खेळला. हा डाव वेळीच ओळखून काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांच्याच नावात खोडा घातला. महाविकास आघाडीचे आमदारांची संख्या 46 असताना, जर फक्त एकच उमेदवार राज्यसभेत पोहोचू शकणार असेल, तर तो काँग्रेसचाच हवा. कारण खऱ्या अर्थाने विरोधात फक्त आता काँग्रेसच आहे. त्यामुळे काँग्रेसच्याच नेत्याला राज्यसभेची संधी मिळावी. भाजपशी आतून किंवा बाहेरून जवळीक साधणाऱ्या शरद पवारांना आपण संधी द्यायची गरज नाही, असा सूर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत उमटला.
– काँग्रेस शिवाय महाविकास आघाडीचा खासदार अशक्य
महाविकास आघाडीचे आमदारांचे संख्याबळ 46 असताना त्यातला 16 आमदारांचा वाटा काँग्रेसचा आहे. काँग्रेसच्या 16 आमदारांनी एकगठ्ठा विरोधात मतदान केले, तर शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार असून सुद्धा राज्यसभेत पोहोचू शकणार नाहीत. त्यांना भाजपच्या कोट्यातल्या अतिरिक्त मतांची गरज लागेल पण भाजपच्या कोट्यातून चार खासदार निवडून जाणार असताना भाजप स्वतःहून आपला एक खासदार कमी करण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजप फार तर पार्थ पवारच्या नावाला होकार देऊ शकेल, पण स्वतःचा एक खासदार कमी करून शरद पवारांच्या नावाला होकार देईल की नाही??, याविषयी दाट शंका आहे.
– निर्णय दिल्लीतून तरीही प्रदेश काँग्रेसचे नेते आक्रमक
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पवारांची “डबल गेम” बरोबर ओळखली. कुठल्याही समीकरणातून पवारांच्याच कुटुंबाचा लाभ होतोय आणि बाकीच्यांना टीकेचे लक्ष्य व्हावे लागते, हे काँग्रेसच्या नेत्यांच्या लक्षात आले म्हणूनच त्यांनी थेट शरद पवारांच्याच नावाला खोडा घातलाय. राज्यसभेच्या उमेदवारीचा निर्णय दिल्लीतले काँग्रेसचे नेते घेणार आहेत पण तरीसुद्धा राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी पवारांचा “डाव” ओळखून त्यांच्या नावाला अटकाव घालायचा प्रयत्न तरी केला, ही वस्तुस्थिती आज समोर आली.
Congress oppose Sharad Pawar’s name for rajya sabha elections
महत्वाच्या बातम्या
- टिपू सुलतानची तरफदारी करून हर्षवर्धन सपकाळांनी मोदींच्या वक्तव्यातले सत्यच तर सिद्ध केले!!
- Nikhil Gupta : खालिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटाचे प्रकरण; भारतीय नागरिक निखिल गुप्ताला 24 वर्षांची शिक्षा
- Trump’s : ट्रम्प म्हणाले- व्हेनेझुएलामध्ये गुप्त शस्त्राचा वापर केला; रशिया-चीनच्या संरक्षण प्रणाली निकामी झाल्या
- ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स : कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा; नागपुरात जागतिक परिषदेचे उद्घाटन