• Download App
    Congress Leader Hidayat Patel Stabbed in Akola; Condition Critical PHOTOS VIDEOS अकोल्यात काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला; प्रकृती गंभीर; राजकीय वैमनस्यातून हल्ल्याचा संशय, आरोपी ताब्यात

    Hidayat Patel : अकोल्यात काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला; प्रकृती गंभीर; राजकीय वैमनस्यातून हल्ल्याचा संशय, आरोपी ताब्यात

    Hidayat Patel

    विशेष प्रतिनिधी

    अकोला : Hidayat Patel काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मोहा‌ळा (ता. अकोट) येथे एका प्रार्थना-स्थळाजवळ जीवघेणा हल्ला झाल्याची घटना मंगळवारी ६ जानेवारीला दुपारी घडली. जीवघेण्या हल्ल्यात पटेल यांच्या पोटावर, मानेवर चाकूने वार केले. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील हिदायत पटेल यांच्यावर अकोट येथे प्राथमिक उपचार करुन त्यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अकोला येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.Hidayat Patel

    गावातील राजकीय पूर्व वैमनस्यातून एका गटाकडून हा हल्ला झाल्याचे ग्रामस्थ व पोलिसांचे म्हणणे आहे. भाजप अल्पसंख्याक सेलचे दिवंगत कार्यकर्ते मतीन पटेल यांच्या गटाने पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. मतीन पटेल यांचा पुतण्या उबेद पटेल याने हा हल्ला केला. याप्रकरणी उबेद पटेलला एलसीबी पथकाने पणज येथून ताब्यात घेतले.Hidayat Patel



    काकाच्या हत्येचा बदला

    २४ मे २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीदरम्यान मोहाळा येथे भाजप अल्पसंख्याक सेलचे माजी पदाधिकारी मतीन शेरखाँ पटेल (५८) यांची हत्या झाली होती. या प्रकरणी हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, त्याची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आपल्या काकाच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशातून हिदायत पटेल यांच्यावर मृत मतीन पटेल यांचा पुतण्या उबेद पटेल याने चाकूने हल्ला केल्याची घटना घडल्याची माहिती गावातील काही प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली. आमचा त्या दिशेने तपास सुरू आहे, असे अकोट पोलिसांनी सांगितले.

    Congress Leader Hidayat Patel Stabbed in Akola; Condition Critical PHOTOS VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!