Sunday, 11 May 2025
  • Download App
    राज ठाकरेंचे कौतुक करत संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर निशाणा, म्हणाले ‘’ते तुमच्यासारखे तर नाही ना, रोज सकाळी भूकायचं आणि...’’ Commenting on Chief Minister Eknath Shinde and Raj Thackeray meeting Sanjay Shirsat criticizes Sanjay Raut

    राज ठाकरेंचे कौतुक करत संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर निशाणा, म्हणाले ‘’ते तुमच्यासारखे तर नाही ना, रोज सकाळी भूकायचं आणि…’’

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊतांनी खोचक टिप्पणी केली होती.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. खरंतर राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजीपार्क येथील सभेतून राज्यातील प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीरपणे सुनावले होते. मात्र यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्याचे समोर आल्यापासून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असून, चर्चांना उधाण आलं आहे. Commenting on Chief Minister Eknath Shinde and Raj Thackeray meeting Sanjay Shirsat criticizes Sanjay Raut

    मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. सदू-मधूची भेट असं म्हणत राऊतांनी टोला लगावला होता. यावर आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.


    सावरकरांचा अपमान : काँग्रेस प्रणित विरोधकांच्या बैठकीवर ठाकरे गटाचा आजही बहिष्कार; पण राऊत – खर्गे आज स्वतंत्र चर्चा


    संजय शिरसाट म्हणाले, ‘’या भेटीत चूक काय झालं? म्हणजे एका ठाकरेला भेटलो तर दुसर ठाकरे नाराज होतो, असं काही आहे का? त्या(राज ठाकरे) माणसाकडे व्हिजन आहे आणि एखाद्याचा चांगला गुण घेणं, त्यात वाईट काय? तुम्ही लोकांच्या मनात वाईटच पेरत चालला आहात. तुम्ही चांगलं बोला ना, तुमच्या चांगल्या सूचना असू द्या ना, चला मी सांगतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना की उद्या आपल्याला उद्धव ठाकरेंना भेटायला जायचं, आहे का उद्धव ठाकरेंची भेटण्याची तयारी, आहे का त्यांच्याकडे काही चांगल्या सूचना? मग चांगल्या सूचना असतील तर त्याचा आदर करायला नको?’’

    याचबरोबर ‘’राज ठाकरेंना अधिकार नाही का, ते का पाकिस्तानातून आल आहेत का? त्यांच्या जर काही चांगल्या सूचना असतील आणि सरकारला जर त्यातून काही सकारात्मक घ्यायचं असेल, तर निश्चित चर्चा झाली पाहिजे, भेटलं पाहिजे. प्रत्येकाला भेटलं पाहिजे, त्यात काही वावगं नाही. परंतु इतरांना भेटले तर यांना पोटशूळ उठतो, तुमच्यासारखे तर ते नाही ना, सकाळी भोंग्यासारखं, कुत्र्यासारखं भू भू भूकायचं आणि चालू द्यायची आपली दिवसभराची दुकानदारी, दिसलो की नाही मी टीव्हीवर, दिसलो की नाही मी टीव्हीवर.’’

    ‘’तो माणूस एकदाच बोलतो, लाखातला एकच शब्द बोलतो सगळ्यांची हवा टाईट होते. काय आहे त्या माणसाकडे, का इतके लाखो लोक जातात? बरं झालं त्यांना गद्दार नाही म्हणत हे लोक. मूर्खाच्या नंदनवनात वावरणारा हा संजय राऊत आहे, त्यावर एवढं लक्ष आपण देऊ नये.’’

    Commenting on Chief Minister Eknath Shinde and Raj Thackeray meeting Sanjay Shirsat criticizes Sanjay Raut

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ