• Download App
    CM Devendra Fadnavis Announces Austerity Measures; Minister Convoys to be Reduced सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करणार; CM फडणवीस यांची घोषणा; नितीन गडकरी बसने प्रवास करणार

    CM Devendra Fadnavis : सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करणार; CM फडणवीस यांची घोषणा; नितीन गडकरी बसने प्रवास करणार

    CM Devendra Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :CM Devendra Fadnavis  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढत्या इंधन टंचाईच्या आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करणार असून, त्यांचे आगामी सर्व परदेश दौरे तातडीने रद्द करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यायचा नसेल तर किमान निंदा करू नये, असा सल्ला फडणवीसांनी विरोधकांना दिला.CM Devendra Fadnavis

    विविध सरकारी कामांसाठी किंवा अभ्यासाच्या नावाखाली परदेशात जाणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संख्येवर यामुळे मोठा परिणाम होणार आहे. परकीय चलन वाचवण्यासाठी आणि प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या आवाहानाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही तातडीच्या कामाशिवाय परदेश प्रवासाला परवानगी दिली जाणार नाही, असे संकेत देण्यात आले आहेत.CM Devendra Fadnavis



    नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

    पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, जागतिक संकटाच्या वेळी देशाचे पंतप्रधान काही उपाय सांगत असतील, तर त्याकडे सकारात्मकपणे पाहिले पाहिजे. जगभरातील अनेक देशांची स्थिती बिकट आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाउन लागलेला आहे. पेट्रोलचे दर ४५० ते ५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तीन-तीन दिवस पेट्रोल मिळत नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    पंतप्रधानांच्या आवाहनाची थट्टा-मस्करी करू नका

    जागतिक संकटात देशाची अर्थव्यवस्था सुरळीत राहावी, देशासमोर संकट निर्माण होऊ नये, या दृष्टीने पंतप्रधान काही उपाय सांगत असतील आणि विरोधकांना त्या अंमलात आणयच्या नसतील, तर किमान त्याची थट्टा-मस्करी तरी करू नका, असा सल्ला फडणवीस यांनी विरोधकांना दिला.

    देशाचे परकीय चलन ज्या गोष्टींसाठी खर्च होते, या गोष्टींचा किमान वापर कसा करायचा याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार देखील करत आहे. याबद्दल मी बैठक देखील बोलावली आहे. पंतप्रधानांनी जो संदेश देशाला दिलाय, त्या दृष्टीने महाराष्ट्र देखील काम करणार आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या जाती. अधिकारी, मंत्र्यांचे परदेश दौरेही कमी केले जातील, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. तसेच मोदी यांनी आपल्याला सहा महिने मागितले आहेत. त्यामुळे ही मुदत न देणे योग्य होणार नाही, असेही मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

    नीट प्रकरणाच्या मुळाशी जाऊन कारवाई व्हावी

    पेपर फुटीचे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतले आहे. कारण आमचे विद्यार्थी एवढा अभ्यास करतात आणि कुणी पेपर लीक करत असतील तर हे चुकीचे आहे. ज्या प्रकरची कारवाई केली जात आहे, त्यात प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई व्हावी. त्यासाठी आम्ही संपूर्ण सहाकार्य करायला तयार आहोत.

    दरम्यान, इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोन उच्चस्तरिय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला आणि त्यानुसार काही निर्णय जाहीर केले. या बैठकांना मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    या बैठकीत जे प्रमुख निर्णय घेण्यात आले, ते पुढीलप्रमाणे…

    मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्यात यावी. बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलिस आयुक्त किंवा पोलिस अधीक्षक यांची असेल.

    मंत्री-अधिकार्‍यांनी कोणतेही विदेश दौरे करु नयेत.

    मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करु नये, त्याऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करावा.
    मंत्री-अधिकारी यांनी आवर्जून मेट्रो आदी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस असा प्रयोग करावा.
    अधिकार्‍यांना बैठकांना बोलावण्याऐवजी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात.
    शासनात वितरित करण्यात आलेल्या वाहनांचा कोटेकोरपणे आढावा घेण्यात यावा.
    ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्ज/फ्लेक्सवरील कारवाई वाढवण्यात याव्यात आणि तेथे डेकोरेटिव्ह लायटिंगचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.

    नितीन गडकरी ताफ्यातील 50 टक्के गाड्या कमी करणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधन बचत आणि काटकसरीबाबत केलेल्या आवाहानाला मंत्र्यांकडून प्रतिसाद देण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या 50 टक्क्यांनी कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच पालखी मार्गाची पाहणी करताना ते बसने प्रवास करणार असल्याची माहिती आहे. नितीन गडकरी 14 आणि 15 मे 2026 रोजी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करणार आहेत. यावेळी ते सुरक्षा रक्षकांसोबत एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणार आहेत. तसेच या दौऱ्यावेळी ताफ्यातील गाड्या 50 टक्क्यांनी कमी करण्यात याव्यात अशी सूचना नितीन गडकरींनी पुणे प्रशासनाला केली आहे.

    केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा मेट्रोने प्रवास

    दुसरीकडे, शिवसेना खासदार आणि केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिल्ली निवासस्थान ते विमानतळ हा प्रवास मेट्रोने केला. यावेळी त्यांच्या ताफ्यातील अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक मेट्रोनचे आले. यावेळी ते मेट्रोचे टोकन घेऊन रांगेत लागलेले दिसले.

    एकनाथ शिंदे स्वत:च्या ताफ्यातील गाड्या करणार कमी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक संकट आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. “देशाचे हित लक्षात घेऊन मी माझ्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असून, आता केवळ सुरक्षेसाठी आवश्यक तितक्याच गाड्या माझ्यासोबत असतील,” असे एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे, इंधन बचतीचा वस्तुपाठ घालून देण्यासाठी त्यांनी स्वतः इलेक्ट्रिक वाहनाचा (EV) वापर सुरू केला असून इतर मंत्र्यांनाही तशाच सूचना दिल्या आहेत.

    पंतप्रधान मोदींचे आवाहन काय?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या आवाहनामध्ये केवळ इंधनच नाही, तर इतर अनेक गोष्टींमध्ये काटकसर करण्याचे सांगितले होते. यामध्ये सोन्याची खरेदी टाळणे, खाद्यतेलाचा वापर मर्यादित करणे आणि जास्तीत जास्त ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य देणे अशा मुद्यांचा समावेश आहे. तसेच नैसर्गिक शेतीचा अवलंब करून स्वदेशी उत्पादने वापरण्यावरही त्यांनी भर दिला आहे. याच आवाहनाचा आधार घेत राज्य सरकारने आता प्रशासकीय शिस्त आणि काटकसरीचा नवा पायंडा पाडला आहे.

    CM Devendra Fadnavis Announces Austerity Measures; Minister Convoys to be Reduced

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    MPSC : MPSCचा मोठा निर्णय!; भरती प्रक्रियेतील ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’चा पर्याय रद्द

    राष्ट्रवादी काँग्रेस वर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी पवार कुटुंबीयांची धडपड; ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करण्यासाठी सगळी तडफड!!

    TCS corporate Jihad : जिहाद्यांकडून बुलडोझर कारवाईचे फुले उधळून स्वागत; इथून पुढे बुलडोझरच्या पलीकडची कारवाई आवश्यक!!