• Download App
    Maharashtra political news May 2026 | The Focus India

    Maharashtra political news May 2026

    Manoj Jarange : मनोज जरांगेंचे 30 तारखेपासून पुन्हा उपोषण; म्हणाले – फडणवीसांना मराठ्यांनीच CM केले, पण समाजाचे वाटोळे होणार असेल तर शांत बसणार नाही

    माझे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वाईट मत नाही. पण माझ्या समाजाचे वाटोळे होणार असेल तर मी तुम्हाला कोणालाच मोजणार नाही. मला मित्र नको, मंत्र्यांशी संबंध नको मला केवळ माझ्या समाजाचे लेकरं मोठी करायची आहेत. मी फडणवीस यांना दोष देत नाही माझं म्हणणं केवळ इतके आहे की हैदराबादचा जीआर काढला पण प्रमाणपत्र रोखले का नाही? ते आता बंद कसे झाले? तुम्हाला मुख्यमंत्री मराठ्यांनीच केले आहे हे लक्षात ठेवा, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 30 तारखेपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 30 मे पूर्वी सर्वांना प्रमाणपत्र द्यावे, नाही तर 30 तारखेपासून आमरण उपोषण करणार, असे त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    Supriya Sule : माझी सुरक्षा आणि गाड्या काढून घ्या; सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी, आर्थिक अन् ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

    देशासमोर सध्या निर्माण झालेले भीषण आर्थिक आणि ऊर्जा संकट पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक अत्यंत महत्त्वाचे आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. आपल्या सुरक्षेसाठी शासनाकडून देण्यात आलेला पोलीस बंदोबस्त आणि शासकीय वाहने तातडीने काढून घेण्यात यावीत, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला अधिकृत आवाहन केले असून, त्यांच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

    Read more

    CM Devendra Fadnavis : सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करणार; CM फडणवीस यांची घोषणा; नितीन गडकरी बसने प्रवास करणार

    : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढत्या इंधन टंचाईच्या आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करणार असून, त्यांचे आगामी सर्व परदेश दौरे तातडीने रद्द करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यायचा नसेल तर किमान निंदा करू नये, असा सल्ला फडणवीसांनी विरोधकांना दिला.

    Read more

    Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणी रूपाली चाकणकरांची एसआयटीकडून 6 तास चौकशी; आर्थिक व्यवहार आणि पूजा-विधींबाबत विचारले प्रश्न

    राज्याला हादरवून सोडणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय धागेदोरे अधिक घट्ट होताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्री रूपाली चाकणकर यांची तब्बल ६ तास कसून चौकशी केली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः दोन तास चाकणकरांना प्रश्नांच्या फेऱ्यात पकडले होते.

    Read more

    Anil Parab : दापोली रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब निर्दोष मुक्त; न्यायालयाच्या निकालावर किरीट सोमय्यांचे मौन

    : दापोलीतील बहुचर्चित साई रिसॉर्ट प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांना खेड येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या जमीन हडप आणि सीआरझेड नियमांच्या उल्लंघनाच्या गंभीर आरोपांनंतर, न्यायालयाने पुराव्याअभावी अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आणि कायदेशीर वादावर तूर्तास पडदा पडला असून, परब यांच्यासाठी हा मोठा कायदेशीर विजय मानला जात आहे.

    Read more