विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Fadnavis ) यांनी विधिमंडळाच्या परिसरात गुरूवारी झालेल्या हाणामारीवर तीव्र संताप व्यक्त केला. कालच्या घटनेमुळे कुणा एकाची प्रतिष्ठा गेली नाही. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा मलिन झाली आहे. आज या ज्या शिव्या बाहेर पडत आहेत, त्या एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. आपल्या सगळ्यांच्या नावाने याठिकाणी बोलले जाते की, हे सगळे आमदार माजले म्हणून, असे ते म्हणालेत.CM Fadnavis
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कालच्या घटनेवर आज विधानसभेत निवेदन केले. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्ती केली. अध्यक्षांनी केलेल्या सूचनांचे मी तंतोतंत पालन करेन. तसेच काल जी घटना घडली आहे, त्यावर मी खेद व्यक्त करतो दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले. पडळकर यांच्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड बोलण्यास उठले. ते म्हणाले, आपण बोलत असताना नितीन देशमुख हे माझ्यासोबत आले होते. पण सभागृहात येताना मी दररोज एकटाच येतो. माझ्यासोबत मी कुणालाही आणत नाही. माझ्यामागे केवळ माझा पीए चालत असतो. त्याच्याशिवाय माझ्यासोबत कुणीही नसतो. मी कधीही कुणाला पासवर सही करत नाही. कुणाला पासही इश्यू करत नाही. त्यामुळे नितीन देशमुखला मी घेऊन आलो होतो हे रेकॉर्डवर चुकीचे जाऊ नये.CM Fadnavis
ते आपल्या ताब्यात आहेत. त्यांना विचारा ते कसे आले होते? मी हे कृत्य करण्यास भाग पाडले असा कुठेही महाराष्ट्रात समज होऊ नये म्हणून मी हे स्पष्टीकरण देत आहे. चुकीचे रेकॉर्डवर येऊ नये. काल ही घटना घडली तेव्हा मी सभागृहात नव्हतो. मी परिसरातही नव्हतो. मी मरीन लाईन्समध्ये होतो. त्यामुळे या घटनेशी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असा माझा कोणताही संबंध नाही. ही घटना घडावी म्हणून मी कुणाला उद्युक्त केले नाही. मी कुणाला खुणावलेही नाही. राहिली गोष्ट या लोकशाहीच्या मंदिराची… ही मंदिरात घडलेली घटना कुणीही घडवली असेल, कशीही घडली असेल, या इमारतीच्या दगडात लोकशाही जिवंत आहे. या मंदिरात झालेली ती अप्रिय घटना कशी घडली हे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले. मला यावर बोलायचे नाही.
पण अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे एक निवेदन केले होते. माझ्या व्हॉट्सएपवर अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यात आली. मला मारण्याची धमकी देण्यात आली. मला बोलू द्या अध्यक्ष महोदय, असे आव्हाड म्हणाले. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मध्येच हस्तक्षेप केला. या विषयाचे गांभीर्य या सभागृहातील सर्व सदस्यांनी घेणे आवश्यक आहे. तुम्ही इतर सर्व गोष्टी मला माझ्या दालनात येऊन सांगितल्या आहेत. त्या सर्व गोष्टींचा विचार करून सुरक्षा रक्षकांकडून अहवाल मागितला. पण आता तुम्हाला या विषयाचे राजकारण करायचे असेल तर हे योग्य नाही. मला वाटते आपल्याला सभागृहाच्या भावनेचा आदर केला पाहिजे, असे ते म्हणाले.
अध्यक्षांच्या या भूमिकेवर शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला. जितेंद्र आव्हाड यांना धमकी आली आहे, त्यामुळे त्याचा उल्लेख करण्यास बंदी करणे हे योग्य नाही, त्यांना बोलू द्या, असे ते म्हणाले.
जयंत पाटील यांच्या या विनंतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेत हस्तक्षेप केला. ते म्हणाले, धमकीचा उल्लेख करण्यास कुणाचीही मनाई नाही. पण विषय काय चालला आहे? आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर आपण कधीतरी राजकारणाच्या पलिकडे जाणार आहोत की नाही? ते वेगळे मांडता येईल ना. पण अध्यक्षांनी एक विषय मांडला एक निर्देश अध्यक्षांनी मांडला, तर असे नाही होत.
जयंतराव एक लक्षात घ्या. फार सिनिअर आहात आपण. ही प्रतिष्ठा काही कुण्या एका व्यक्तीची नाही. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा खराब झाली आहे. आज या ज्या शिव्या बाहेर पडत आहेत, त्या एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. आपल्या सगळ्यांच्या नावाने याठिकाणी बोलले जाते की, हे सगळे आमदार माजले म्हणून. त्यामुळे थोडे गांभिर्याने घ्या. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करून तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगणार आहात जयंतराव? हे बरोबर नाही. अशा प्रकारे समर्थन करणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
CM Fadnavis Displeasure Assembly Brawl
महत्वाच्या बातम्या
- बरोबरच आहे राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट फडणवीस कशाला लिहून देतील??, पण…
- India-UK : भारत-ब्रिटनमध्ये FAT वर स्वाक्षरीची शक्यता; ब्रिटनच्या आलिशान गाड्या आणि ब्रँडेड कपडे स्वस्त होणार
- Robert Vadra : गुरुग्राम लँड डीलमध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; पहिल्यांदाच ईडीने औपचारिक आरोपी बनवले
- पडळकरांच्या मुद्द्यावरून पत्रकारांनी फडणवीसांना छेडले; पण अजितदादांना शेजारी बसवून फडणवीसांनी आव्हाडांचेही वाभाडे काढले!!