• Download App
    CM Fadnavis Demands Substantial NDRF Aid For Farmers From Amit Shah NDRF मधून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव मदत द्यावी;

    CM Fadnavis : NDRF मधून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव मदत द्यावी; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री शहांकडे मागणी

    CM Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : CM Fadnavis  राज्यात विशेषतः मराठवाड्यात यंदा पावसामुळे धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत यंदा अतिवृष्टी झाली असून, त्यात अमाप नुकसान झाले आहे. विशेषतः त्यात जवळपास 84 जणांचा बळीही गेला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारकडे हेक्टरी 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने अतिवृष्टी व महापुरात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबईत आले असता त्यांच्याकडे देखील मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.CM Fadnavis

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान याबाबत एक सविस्तर निवेदन आज आमचे नेते, देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह यांना दिले. एनडीआरएफमधून भरीव मदत महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.CM Fadnavis



    दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळ आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी करत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. तसेच दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरले, असा इशारा ठाकरेंनी दिला आहे.

    शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे आवश्यक- सुप्रिया सुळे

    तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारला सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या, पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पैशाची मागणी करावी. कारण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तीन टप्प्यात काम करावे लागणार आहे. सध्या तात्काळ मदत म्हणून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा कर्ज उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांच्या घरांचे आणि शेतीचे नुकसान भरून काढणे, अशा तीन टप्प्यात सरकारला काम करावे लागणार असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

    केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राला मदत करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेला प्रश्नांना देखील त्यांनी उत्तर दिले. केंद्र सरकार मदत करण्यासाठी तयार आहे. मात्र त्यासाठी आधी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. आधी प्रस्ताव पाठवला जाईल, त्यानंतर त्यावर चर्चा होईल आणि मग केंद्र सरकारकडून मदत मिळेल. आतापर्यंत या सर्व गोष्टीला सुरुवात व्हायला हवी होती, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

    CM Fadnavis Demands Substantial NDRF Aid For Farmers From Amit Shah

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Jayant Patil : जयंत पाटलांची मागणी- राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकला; अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती नाही

    Fadnavis : फडणवीस सरकारची अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत सुरू, मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख, जिल्हाधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार

    Sameer Wankhede : समीर वानखेडेंची हायकोर्टात याचिका, म्हणाले- आर्यन खानच्या सिरीजमध्ये माझी बदनामी, 2 कोटींच्या भरपाईची मागणी